एक्स्प्लोर

Nanded Crime News : खलबत्याने ठेचून स्वतःच्या आईची हत्या, नांदेड जिल्हा हादरलं; पोलिसांकडून मनोरुग्ण मुलावर गुन्हा दाखल

Nanded : पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता, महिलेच्या मनोरुग्ण मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचे समोर आले आहे.

नांदेड : जिल्ह्यात आधी पत्नीची हत्या करून नंतर स्वतः गळफास घेतल्याची घटना ताजी असतानाच, आता खलबत्याने ठेचून मुलानेच स्वतःच्या आईची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या (Nanded) नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. बरबडा गावात एका महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता, महिलेच्या मनोरुग्ण मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, महिलेच्या पतीने फिर्याद दिल्यानंतर मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोदावरीबाई लिंगोबा वटपलवाड (वय 44 वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. 

अधिक माहितीनुसार, गोदावरी लिंगोबा वटपलवाड ही महिला पती आणि दोन मुलांसह बरबडा येथील पेठगल्लीत राहत होती. शनिवारी गोदावरीबाई आणि त्यांचा मनोरुग्ण मुलगा श्रीनिवास वटपलवाड हे दोघेच घरी होते. दरम्यान सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास लिंगोबा वटपलवाड हे घरी आल्यानंतर त्यांना गोदावरीबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. मृतदेहाच्या शेजारीच रक्ताने माखलेला खलबत्ता होता. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली होती. तर, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर आणि अधिक चौकशी केल्यावर मनोरुग्ण असलेल्या मयत महिलेचा मुलगा श्रीनिवासवर त्यांचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली आहे. 

मयत गोदावरीबाई वटपालवाड आणि त्यांचा मनोरुग्ण मुलगा श्रीनिवास दोघेच घरी होते. दरम्यान, मुलगा व आईमध्ये वाद झाला होता. वादाच्या भरात मुलाने आईचा खून केला आहे. हा मुलगा मनोरुग्ण आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास संबंधित महिलेचा पती घरी आल्यावर ही घटना त्यांना कळाली. त्यांनी लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर मुलगा श्रीनिवास याने आपल्या स्वतःच्या आईचा अशा प्रकारची अत्यंत निर्दयी दगडाने ठेचून खून केल्याचे समोर आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, यामुळे संपूर्ण बरबडा शोककळा पसरली आहे. कुंटूर पोलिसांत श्रीनिवास विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आईने जीव लावला पण...

बरबडा गावात गोदावरीबाई लिंगोबा वटपलवाड पती आणि दोन मुलांसह राहत होत्या. त्यांना दोन मुलं होती. मात्र, यातील श्रीनिवास मनोरुग्ण होता. पण असे असतांना देखील गोदावरीबाई वटपलवाड यांनी कधीच दोघांमध्ये फरक केला नाही. किंबहुना श्रीनिवास मनोरुग्ण असल्याने त्याला अधिक जीव लावला. असे असताना देखील आई-मुलामध्ये झालेल्या वादातून श्रीनिवासने थेट आईची हत्या करून त्यांचा जीव घेतला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded Crime News : आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वतः घेतला गळफास; सुखी संसाराचा भयंकर शेवट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parag Shah Wheelchair : व्हिलचेअरवर बसून पराग शाह विधानभवनात दाखलSpecial Report Beed Fake Medicine : विषारी डोस! सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठाEknath Khadse:Devendra Fadnavis यांच्यासोबत शत्रुत्व नाही,व्यक्तिगत संबंध चांगले,खडसेंचे सूर बदलले?Special Report BJP MNS : पाठिंब्याच्या बदल्यात भाजप मनसेला कोणतं गिफ्ट देणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Embed widget