मोठी बातमी: नांदेडमध्ये खड्डे चुकवण्याच्या नादात भीषण अपघात; तिघांनी जीव गमावला, सात जखमी
Nanded : मयत व जखमी सर्व आठवडी बाजाराचे किरकोळ व्यापारी होते.
Nanded News: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील राजवाडी गावाजवळ आठवडी बाजाराठी हिमायतनगरकडे जाणारा टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन व्यवसायिकांचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला व अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात 3 ठार तर 07 जण जखमी झाले असून, जखमींना मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मयतांचे प्रेत शासकीय रुग्णालयात उत्तरतपासणीसाठी हलवण्यात आले आहे.
अपघातात मयत झालेल्यामध्ये म. हाफीजम. हुसेन, म रफीक म. आमिनसाब, म. चांद म. मिरासाब यांचा समावेश आहे. तर जखमींवर मुदखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान किरकोळ भाजीपाला व्यावसायिक असणारे हे सर्वजण आज हिमायतनगर येथील आठवडी बाजारासाठी जात होते. मयत व जखमी सर्व आठवडी बाजाराचे किरकोळ व्यापारी होते. हिमायतनगरच्या बाजारासाठी जात असताना खड्डयांमुळे राजवाडी तांडा जवळ हा अपघात झालाय.