एक्स्प्लोर

Nanded: नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यातील आणखी 9 गावं लम्पी बाधीत क्षेत्र म्हणून घोषित

Lumpy Skin Disease: बाधित गावांच्या पाच किलोमीटर परिसरात आता लसीकरण केले जाणर आहे. 

Lumpy Skin Disease: महाराष्ट्रासह देशभरात तैमान घातलेल्या लम्पी आजार आता मराठवाड्यात (Marathwada) देखील पाय पसरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) सहा तालुक्यात लम्पी बाधित जनावरे आढळून आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, माहूर, लोहा, भोकर, हिमायतनगर तालुक्यातील 9 गावं बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे बाधित गावांच्या पाच किलोमीटर परिसरात आता लसीकरण केले जाणर आहे. 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली बिलोली तालुक्यातील आरळी, बावलगाव तसेच माहूर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील कलंबर भोकर तालुक्यातील नांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी या गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. पशुधनामध्ये लम्पी स्किन डिसीजची लागण झाल्याचा रोग निदान अहवाल सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश...

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार, रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5  कि.मी. त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या परिसरातील गावांमध्ये बाधीत जनावरे वगळता इतर जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. साथीच्या काळात बाधीत भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. बाधीत गावामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चराई करिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व अबाधीत जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगानेग्रस्त पशुधनाचा मृत्यु झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासकीय यंत्रणांना महत्वाच्या सूचना...

सोबतच जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्यात बाधीत परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी, रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी, लम्पी स्किन रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी असे सांगितले आहे. कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचेविरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. 

परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई

सर्व खाजगी पदविकाधारकांनी-पशुपालकांनी लम्पी स्किन रोगांची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी स्किन रोगाचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात यावा. खाजगी पदविकाधारकांनी लम्पी स्किन रोगांचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी लम्पी स्किन रोगांच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करुन उपलब्ध करुन घ्याव्यात, असेही आदेशात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget