Nanded News: गरोदर मुलीला माहेरी आणताना अपघात, वेळेत उपचार न मिळल्याने बाप-लेकीसह गर्भातील बाळाचा वाटेत दुर्दैवी मृत्यू
Nanded News: नांदेडमध्ये वेदनादायी घटना घडली आहे. रस्त्यातील खड्ड्यांनी बाळंतपणासाठी मुलीला माहेरी आणताना दुचाकीचा अपघात झाला.
नांदेड: मुलीच्या घरी नवा पाहुणा येणार ही गोड बातमी कळाली सर्वांचा आनंद गननात मावेनासा झाला. मुलीचे बाळंतपण माहेरी करण्याची तयारी सुरू झाली. नव्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी सर्व आतुक असताना एक बातमी आली. या आनंदावर विरजण पडलं आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. बाळंतपणासाठी मुलीला माहेरी आणताना दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप-लेकीसह गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कंधार तालुक्यातील फुलवळ अंतर्गत असलेल्या सोमासवाडी येथील रहिवासी असलेले बालाजी किशनराव रासवते (वय 40 वर्ष) हे मुलीला बाळांतपणासाठी उदगीरला बाळंतपणासाठी आणण्यासाठी गेले. उदगीरहून परत येताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर असलेल्या पाटोदा खुर्द नजीक वळणाच्या ठिकाणी दुचाकी क्रमांक एम एच 25 , ए वाय 8226 चा अपघात होऊन बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बालाजी रासवते यांची द्वितीय कन्या राजश्रीचा नांदेडच्या तामसा तालुक्यातील राजेश श्रीमंगले येथील युवकाशी गेल्या वर्षी विवाह झाला होता. नोकरीच्या निमित्ताने राजेश श्रीमंगले हे आपल्या पत्नीला म्हणजे राजश्रीला घेऊन उदगीर येथे राहत होते. राजश्री ही सात महिन्याची गरोदर असल्याने आपल्या मुलीला आणण्यासाठी बालाजी रासवते हे सोमवारी उदगीरला गेले. बुधवारी रात्रीच्या वेळी मुलीला परत येत असताना कंधार तालुक्यातील पाटोदा खुर्द राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वळणावरच्या रस्त्या लगतच्या खोल खड्ड्यात कोसळल्याने बाप-लेकीचा आणि पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ळेत उपचार न मिळाल्याने बाळ आणि बाळंतिणीचा वाटेतच बळी गेला.
दरम्यान डोक्याला आणि इतर ठिकाणी जबरदस्त मार लागला. रात्रीच्या वेळी वेळेवर मदत न मिळाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान सकाळी पहाटे पाटोदा येथील युवक व्यायाम करण्यासाठी सदर रस्त्यावरून जात असताना रस्त्यालगत खड्ड्यात एक दुचाकी तसेच एक पुरुष व एक महिला असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी जवळ जाऊन अंदाज घेतला असता दोघेही मृत असल्याचे कळताच त्यांनी जळकोट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
सुनेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या सासऱ्याचा मृत्यू
सुनेच्या (Daughter-in-Law) डोहाळे जेवणाच्या (Baby Shower) कार्यक्रमाला जाणाऱ्या सासऱ्याचा (Father-in-Law) अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड-अहमदनगर महामार्गावर (Beed Ahmednagar Highway) घडली. रामदास मिसाळ असं मृत सासऱ्याचं नाव आहे. सुनेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी जामखेडहून अहमदनगरकडे जात होते. याचवेळी शिवशाही बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यातच रामदास मिसाळ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ते जामखेड तालुक्यातील आनंदवाडी इथले रहिवासी होते.