व्हिडिओ: सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय, पाहा ड्रोनद्वारे घेतलेले धबधब्याचे विहंगम दृश्य
Nanded Sahastrakund Waterfall : सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य स्थानिक फोटोग्राफर पवन निमलवाड यांनी आपल्या ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहे.
Nanded Sahastrakund Waterfall : मागील तीन-चार दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाले असूनm हाहाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान नांदेडमधील मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आल्याने सहस्त्रकुंड धबधबा (Sahastrakund Waterfall) ओसंडून वाहत आहे. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नागरिक देखील मोठी गर्दी करत आहे. तर हे विहंगम दृश्य स्थानिक फोटोग्राफर पवन निमलवाड यांनी आपल्या ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहे.
असे आहे दृश्य!
- अंदाजे 100 ते 150 फुटावरून सहस्त्रकुंड धबधबा कोसळतोय
- सहस्त्रकुंड धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
- या व्यंगमदृश्याचा आनंद पर्यटक 80 फुट उंचीच्या मनोऱ्यावरून घेत आहेत.
- धबधब्याच्या काठावर पुरातन कालीन महादेव मंदिर असल्याने दर्शनासाठी ही भावीक येतात.
व्हिडिओ: सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय, पाहा ड्रोनद्वारे घेतलेले धबधब्याचे विहंगम दृश्य#Nanded #Rain @abpmajhatv pic.twitter.com/88zvXRr1Fz
— Mosin Shaikh (@mosinKS) July 24, 2023
नागरिकांची गर्दी...
पावसाळा सुरु झाल्यावर पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी देखील नागरीक अशीच काही गर्दी करतात. त्यातच मागील तीन-चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आल्याने हा धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामुळे विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत आहे. तर अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये हे सुंदर दृश्य टिपताना पाहायला मिळतायत.
पावसामुळे नद्यांना पूर...
मान्सून उशिराने दाखल झाल्याने जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तर थेट जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडताना पाहायला मिळाले. अशात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी धबधबे कोसळतानाचे चित्र आहे. तर नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा देखील असाच कोसळतांना पाहायला मिळत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सहस्त्रकुंड धबधब्याचा प्रवाह सुरु झाल्याने हे पाहण्यासाठी नांदेडकर गर्दी करण्याची शक्यता आहे.
तीन-चार दिवसांत जोरदार पाऊस...
मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटल्याने बचावकार्य करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. तर, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव फुटला असून, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हिमायतनगर तालुक्यात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटून पिकांसह माती खरडून गेली आहे. खरीप पिकांचे यामुळे मोठं नुकसान झाले आहेत. तर प्रशासनाने तात्काळ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
गिरीश महाजनांकडून नांदेडच्या पूरग्रस्त भागाची पाहणी, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश