एक्स्प्लोर

Nanded News : गावरान आंब्याच्या 'कैरी'ला मोठी मागणी, नांदेड जिल्ह्यातून निर्यातीत वाढ; यंदा लोणचं महागणार

Nanded : सध्या परराज्यात आंब्याच्या कैरीला (Raw Mango Demand) मोठी मागणी आहे. त्यामुळं नांदेड जिल्ह्यातून कैरीची निर्यात सुरु आहे.

Nanded News : मागील वर्षात समाधानकारक पाऊस (Rain) झाल्यामुळं गावरान आंब्याची (Mango) झाडे चांगलीच बहरली आहेत. सध्या परराज्यात आंब्याच्या कैरीला (Raw Mango Demand) चांगला दर मिळत असल्याने शेतकरी (Farmers) आंब्याची झाडे विकत आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.  एक झाड पाच हजार ते पंधरा हजारापर्यंत विकलं जात आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील पार्डी अर्धापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कैऱ्यांची निर्यात सुरु आहे. 

 कैरीला 50 ते 70 रुपये प्रति किलोचा दर

सध्या परराज्यात कैरीला मोठी मागणी आहे. त्यामुळं शेतकरी आंब्याची झाडं विकून चार पैसे कमवत आहेत. एक झाड साधारणत: पाच हजार ते पंधरा हजारापर्यंत विकले जात आहे. कैरी असतानाच आंबा तोडला जात असल्याने लोणचं महाग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच गावरान आंब्याचा आमरस सुद्धा महाग होऊ शकतो. सध्या बाजारपेठेत कैरीला 50 ते 70 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. अनेक शेतकरी कैरी अवस्थेत असताना आंब्याचे झाड विकत आहेत. म्हणूनच यंदा गावरान आंब्याचे लोणचं महाग होऊ शकतो.

आर्थिक फायदा मिळवण्यासाठी गावरान आंबा चांगला पर्याय

आंबा उत्पादकांना आर्थिक फायदा मिळवण्यासाठी गावरान आंबा चांगला पर्याय आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळं होणारं नुकसान शेतकऱ्यांसाठी घातक ठरु लागलं आहे. यामुळं कैरी असतानाच आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. वादळी वाऱ्यामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कैरी असतानाच आंब्याची विक्री करुन चार पैसे पदरात पाडून घेत आहेत.

मोठ्या शहरात कैरीला मागणी

अर्धापूर तालुक्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणात इंदोर, अकोला, यवतमाळ, पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरांत कैरीची निर्यात करत आहे. तसेच या शहरातील बाजारपेठेत कैरीला मागणी आहे. त्यामुळं कैरीला चांगला दरही मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आतापर्यंत 200 कट्टे माल निर्यात केला आहे. आणखी दोन आठवड्यांत 500 कट्टे पाठवला जाणार असून, एका कट्ट्यात 50 किलो कैरी भरली जात असल्याची माहिती शेतकरी गोपीनाथ मोकळे यांनी दिली. सध्या कैरीला चांगला दरही मिळत आहे. याचा चांगला फायदा होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं लोणचं आणि आमरस महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Kacchi Kairi Health Benefits : आंबट कैरी आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nanded: दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक, रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेडमध्ये श्रीराम फायनान्ससह बजाज फायनान्सची कार्यालये फोडली!
दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक, रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेडमध्ये श्रीराम फायनान्ससह बजाज फायनान्सची कार्यालये फोडली!
Nanded News: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची आरोग्य केंद्राला अचानक भेट; कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईचा बडगा नांदेडच्या सोनखेडमध्ये 'नायक' स्टाईल धाड!
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची आरोग्य केंद्राला अचानक भेट; कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईचा बडगा नांदेडच्या सोनखेडमध्ये 'नायक' स्टाईल धाड!
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Maharashtra Rain Weather updates: वाऱ्यांचा वेग वाढला, वातावरण बदलायला सुरुवात, 13 राज्यांत पाऊस पडणार, महाराष्ट्रात काय स्थिती?
वाऱ्यांचा वेग वाढला, वातावरण बदलायला सुरुवात, 13 राज्यांत पाऊस पडणार, महाराष्ट्रात काय स्थिती?

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget