एक्स्प्लोर

अनुसूचित जमातीतील व्यक्तींना हिंदू विवाह कायदा लागू होत नाही, नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय

Nanded News : पोटगी प्रकरणात नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अनुसूचित जमातीतील व्यक्तींना हिंदू विवाह कायदा लागू होत नसल्याचं सांगत न्यायालयाने फारकतीचा दावा फेटाळला.

नांदेड : पोटगी प्रकरणात नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अनुसूचित जमातीतील (आदिवासी) व्यक्तींना हिंदू विवाह कायदा लागू होत नसल्याचा निर्वाळा देत न्यायालयाने अखिलेश आणि सुप्रिया (दोघांचीही नावे बदलली) यांचा फारकतीचा दावा फेटाळला. 2018 साली अखिलेश आणि सुप्रिया यांचा विवाह झाला होता. सुप्रिया ही शासकीय कर्मचारी आहे तर अखिलेश हा प्राध्यापक आहे. 

अखिलेश हा मानसिक त्रास देतो तसेच आम्ही दोघे पती-पत्नी गेल्या दोन वर्षापासून वेगवेगळे राहतो. दोघांवर एकमेकांच्याविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी आहेत आणि भविष्यात दोघांचा सुखी संसार होऊच शकत नाही, असे म्हणत सुप्रियाने नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयात अखिलेशच्या ‌विरोधात हिंदू कायद्यानुसार फारकत मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता. 

पतीने घटस्फोट मागितला, पत्नीने अपत्य मागितलं; महिलेची मागणी कोर्टाकडून मंजूर

या प्रकरणात प्रा.अखिलेशच्या वतीने अॅड मंगल पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, दोघेही अनुसूचित जमात (एसटी) प्रवर्गातील आहेत. त्यामुळे हिंदू विवाह कायदा 1955 कलम 2 (2 ) अन्वये हिंदू विवाह कायदा हा लागू होत नाही. त्यामुळे अशा समाजातील व्यक्तींना हिंदू कायद्यानुसार फारकतीची कार्यवाही करता येत नाही. तर सुप्रियाने न्यायालयात युक्तिवाद केला की, आम्ही हिंदू देवतांची पूजा करतो. तसेच हिंदूंचे सण उत्सव हे साजरे करतो. 

दोन्ही बाजूंची कागदपत्रे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी अनुसूचित जमात (एसटी) प्रवर्गाला हिंदू विवाह कायदा लागू होत नाही, असा निर्णय दिला. दरम्यान पोटगी, वाटणी, दत्तक घेणे यासंदर्भात अनुसूचित जमातीतील व्यक्तींसाठी हिंदू विवाह कायदा लागू होत नसल्याचं न्यायालयाने सांगितलं. तर अनुसूचित जमातीसाठी अशा प्रकरणासाठी अद्यापही कोणताही कायदा अस्तित्त्वात नसल्याचं अॅड. शिवराज पाटील यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
Eknath Shinde Shrikant Shinde: निवडणुकीसाठी विकलेली 22 गुंठे जमीन शिंदेंनी मिळवून दिली परत; उपमुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता पाहून शिवसैनिक गहिवरला
निवडणुकीसाठी विकलेली 22 गुंठे जमीन शिंदेंनी मिळवून दिली परत; उपमुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता पाहून शिवसैनिक गहिवरला
Nanded News: निवडणुकीसाठी 22 गुंठे जमीन विकली, पण थोडक्यात पराभव; सारं गमावलं तरीही निष्ठा कायम! शिवसैनिकाच्या डोळ्यांतील अश्रू पाहून शिंदे पिता-पुत्र गहिवरले, शेती पुन्हा मिळवून दिली
निवडणुकीसाठी 22 गुंठे जमीन विकली, पण थोडक्यात पराभव; सारं गमावलं तरीही निष्ठा कायम! शिवसैनिकाच्या डोळ्यांतील अश्रू पाहून शिंदे पिता-पुत्र गहिवरले, शेती पुन्हा मिळवून दिली

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 
ज्याची भीती होती तेच घडलं, अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चे संकेत
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
Embed widget