Maharashtra Live blog: साताऱ्यामध्ये आयुष्य संपवलेल्या महिला डॉक्टरवर बीडमध्ये रात्री उशीरा अंत्यसंस्कार
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog: मिरारोड येथील काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डाचकूल पाडा येथे दोन गटात झालेल्या वादानंतर काल सायंकाळी एआयएमआयएम चे नेते वारीस पठाण यांनी डीसीपी राहूल चव्हाण यांची भेट घेवून, एका गटावरच पोलीस कारवाई करत असल्यावर आक्षेप घेत दुस-या गटावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मला भारताच्या संविधानावर विश्वास असून, पोलीसांनी योग्य तपास करण्याची मागणी केली आहे.
काशिगाव येथील डाचकूल पाडा येथे दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी ऑटो रिक्षाच्या वॉशिंग आणि पार्किंग वरुन वाद झाला होता. त्यात ३० ते ३५ ऑटो रिक्षा फोडण्यात आल्या होत्या, दोन गटातील तणाव वाढला होता. काही दिवसापूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही भेट दिली होती. त्यानंतर काल सायंकाळी उशीरा एआयएमआयएम चे नेते वारीस पठाण यांनी डीसीपी राहूल चव्हाण यांच्याशी त्यांच्या मिरा रोडच्या कार्यालयात भेट घेतली.
मुंबई शहरात रात्रीच्या वेळी घरपोडी करणाऱ्या आरोपी विरुद्ध आरे पोलिसांची मोठी कारवाई
गोरेगाव पूर्वेत रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार पिता-पुत्र यांना आरे पोलिसांकडून 12 तासाच्या आत अटक
अटक आरोपी पिता-पुत्र कडून चोरीला गेलेल्या शंभर टक्के मालमत्ता हस्तगत
काही दिवस पूर्वी गोरेगाव पूर्वेत आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रॉयल पाम्स मध्ये असलेल्या बंगल्याच्या हॉलची काच तोडून या आरोपीकडून 36 लाख रुपयाची मालमत्ता चोरी केली होती
याप्रकरणी आरे पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करून परिसरात असलेल्या 35 सीसीटीव्ही कॅमेरा चेक करून दोन आरोपींना अटक केली आहे
अटक दोन्ही आरोपी हे पिता पुत्र असून त्यांचे नाव नियामतुल्ला आयुब खान वय 38 वर्ष, शाहिद नियामतुल्ला खान वय 19 वर्ष आहे.
अटक आरोपीकडून चोरीला गेलेल्या शंभर टक्के मालमत्ता आरे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे,
तसेच हे सराईत आरोपी असून मुंबई शहरात आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे यामध्ये अजून कोण साथीदार आहेत का या संदर्भात अधिक तपास आरे पोलीस करत आहे....
माढ्यातील हाॅटेलमध्ये महिलेवर जबरदस्ती; आरोपीविरुध्द बलात्कारासह अत्याचाराचा गुन्हा नोंद
माढ्यातील हॉटेलमध्ये विवाहित महिलेला फसवून हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णन यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला आहे.
या प्रकरणी माढा पोलिस ठाण्यात पंडित वसंत गोरे (रा. अंतरगाव, ता. भूम, जि. धाराशिव) या आरोपीविरुद्ध बलात्कारासह अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.























