नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, तीन जण पुरात अडकले; बचाव पथकाच्या मदतकार्यात अडथळे
Nanded Rain Update : बचाव कार्यात अनेक अडथळे येत असून, नांदेडहून एसडीआरएफची टीम माहुरकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
Nanded Rain Update : नांदेड (Nanded) जिल्ह्यात काल रात्रीपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील माहुर तालुक्यात पैनगंगा नदीला पुर आला आहे. तर टाकळी या गावात पुराच्या पाण्यात एकाच कुटुंबातील तीन जण अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. भंडारी कुटुंबाचे नदीच्या पलीकडे शेत असून, काल ते शेतात गेले होते. मात्र सायंकाळी नदीचा प्रवाह वाढल्याने आणि सकाळी पुराचे पाणी वाढल्याने ते शेतातच अडकले आहेत. त्यांच्या शेतात देखील पाण्याचा वेढा पडला आहे. तर या पाण्यात तिंघे जण अडकले असून, सद्या ते शेतातील घराच्या पत्रावर थांबले आहेत. दरम्यान स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचल आहे. मात्र बचाव कार्यात अनेक अडथळे येत आहे. तर नांदेडहून एसडीआरएफची टीम माहुरकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
मांडवी हद्दी मध्ये पैनगंगा नदीचे पाणी पुलाला भिडून वाहत असून पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे मांडवी, उनकेश्वर व विदर्भात जाणाऱ्या पारवा, घाटंजी रोड वरील वाहतूक थांबवण्यात आली. आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. @CMOMaharashtra @PTI_News @MahaDGIPR pic.twitter.com/PEhqYpYxi0
— District Information Office, Nanded (@InfoNanded) July 22, 2023
नांदेड हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय. सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याने अक्राळविक्राळ रुप धारण केल असून, धबधब्याचा हा रुद्र अवतार पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलीय. दरम्यान या पुराच्या स्थितीत धबधब्याकडे जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलय. तसेच पैनगंगा नदीला पूर आला आल्याने माहूर जवळच्या धनोडा इथल्या पुलावरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत. त्यामुळे माहूर- धनोडा रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आलीय. याच ठिकाणी टाकळी गावाच्या शिवारात काल सांयकाळपासून तिघे जण अडकलेले आहेत. त्या तिघांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू झाले असून, घटनास्थळी एसडीआरएफचे पथक पोहोचले आहे.
सकाळपासून काय-काय घडलं?
- मांडवी हद्दीमध्ये पैनगंगा नदीचे पाणी पुलावरून वाहत असून, पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे मांडवी, उनकेश्वर व विदर्भात जाणाऱ्या पारवा, घाटंजी रोडवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
- हदगाव उमरखेड पैनगंगेवरील पूल वाहतुकीसाठी सुरू. पुलाच्या खालून दहा ते पंधरा फूट खाली पाण्याचा प्रवाह सुरु आहे.
- पैनगंगा नदीला पूर आल्याने माहूर, किनवट मार्गावर सखलभागात पाणी. माहूर, सहस्त्रकुंड धबधबा व इतर स्थळांना दर्शन व पर्यटनासाठी दोन दिवस पूर ओसरेपर्यंत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन.
- अतिवृष्टीमुळे पैनगंगेला पूर. माहूर जवळ टाकळी येथे पुरात आडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी बचावपथके रवाना. प्रशासनाची टीम संपर्क ठेवून जागेवर हजर आहे.
- किनवट येथील मोमीनपुरा वस्तीत पुराचे पाणी. प्रशासनाकडून 80 लोकांचे उर्दू शाळेत स्थलांतर. तहसीलदार व टीम जागेवर हजर. लोकांना सतर्कतेचे आदेश.
- माहूर परिसरात काल रात्रभर मुसळधार पाऊस. पैनगंगा नदी काठच्या गवत पूर. जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेच्या सूचना. प्रशासनाच्या टीम जागोजागी तैनात.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nanded Rain Update : नांदेडच्या 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पाहा जिल्ह्यात कोठे काय परिस्थिती?