एक्स्प्लोर

Nanded : नांदेडमधील लांडगेवाडी महामार्गाजवळ शेतातील घरामध्ये दरोडा, दाम्पत्यास मारहाण करून सोने-चांदी घेऊन दरोडेखोर पसार

Nanded Crime : दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत विमलबाई मेहरबान चव्हाण आणि मेहरबान परसराम चव्हाण हे दाम्पत्य गंभीर जखमी झालं असून त्यांच्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नांदेड: लातूर-नांदेड महामार्गालगत लांडगेवाडी जवळ असलेल्या एका शेतातील घरावर दरोडेखोरांनी दरोडा (Nanded Landgewadi Highway Robbery) टाकल्याची घटना घडली. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

राष्ट्रीय महामार्ग 361 लगत शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहत असलेले मेहरबान परसराम चव्हाण आणि त्यांच्या पत्नी विमलबाई मेहरबान चव्हाण हे लांडगेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या  शेतात सालगडी म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत दोन मुले आणि एक सून राहते. मोठा मुलगा गणेश चव्हाण (वय 32) ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो, तर लहान मुलगा कृष्णा चव्हाण हा शिक्षण घेतो. मंगळवारी पहाटे दीडनंतर दोन चोरटे अचानक मेहरबान चव्हाण राहत असलेल्या ठिकाणी दाखल झाले. 

यावेळी त्यांनी सर्वप्रथम मोठा मुलगा आणि सून झोपलेल्या रुमचा दरवाजा बाहेरुन बंद करून बाहेर झोपलेल्या मेहरबान चव्हाण यांच्यावर हल्ला केला. लहान मुलाला तोंड दाबून ठेवले आणि घरात झोपलेल्या विमलबाई मेहरबान चव्हाण यांच्याकडे मोर्चा वळवत त्यांचे दागिने काढून घेतलं. त्यांनाही लोखंडी रॉडने आणि दगडाने मारहाण केली. संधी साधून लहान मुलगा कृष्णा धावत गावाकडे पळाला. त्याच्या आरडाओरडीमुळे लोक जमा होत असल्याचे पाहून चोरट्यांनी चांदीचे वाळे साठ तोळे, चांदीचे दंडकडे चाळीस तोळे, सोन्याचे गंठन पाच ग्रॅम, सोन्याचे मंगळसूत्र 2.5 ग्रॅम, चांदीची मूर्ती असा एकूण अंदाजे 72,000 रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. 

या हल्ल्यात विमलबाई मेहरबान चव्हाण आणि मेहरबान परसराम चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माळाकोळी पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारनंतर मुलगा गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे करत आहेत. आरोपी शोध घेण्यासाठी 5 पथके स्थापन केली आहेत. आतापर्यंत 15 संशयित लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. 

ही बातमी वाचा: 

 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget