एक्स्प्लोर

Nagpur Crime : विवाहित महिलेशी अश्लिल चॅटिंग ; नामांकित कंपनीच्या सुपरवायझरची पोलिसांसमोरच 'धुलाई', Video Viral

पोलीस आरोपीला घेऊन पोलीस स्टेशनला आल्यावर पोलिसांच्या तावडीतून आरोपीला खेचून भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्याची चांगलीच 'धुलाई' केली आणि त्याचे कपडे फाडले  असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात पोलीस स्टेशन समोरच नागरिकांनी विनयभंग प्रकरणातील आरोपीची 'धुलाई' केल्याची घटना घडली. याचा व्हिडीओ शहरात चांगलाच व्हायरल झाला आहे. आरोपीचे नाव रघुवेंद्र उपाध्याय असून तो मौदा तालुक्यातील एका नामांकित खाजगी कंपनीचा सुपरवायझर आहे.

प्राप्त माहितीनुसार आरोपीने तीन आठवड्यांपूर्वी त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेसोबत अश्लिल चॅटिंग केली होती. तसेच संबंधित महिलेला अश्लील हातवारे करुन व्हिडीओ कॉलही केला होता. यातून पिडीता घाबरली. तिने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर दोघा पती-पत्नींनी पोलिस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगत तक्रार केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतरही त्याला अटक केली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक बीजेपी कार्यकर्त्यांनी कालपासून पोलीस स्टेशन समोरच आंदोलन सुरू केले होते.

रविवारी सायंकाळी पोलीस आरोपीला अटक करुन पोलीस स्टेशनला आल्यावर पोलिसांच्या तावडीतून आरोपीला खेचून आणत स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. काल संध्याकाळी पोलीस आरोपीला घेऊन पोलीस स्टेशनला आल्यावर पोलिसांच्या तावडीतून आरोपीला खेचून भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्याची चांगलीच 'धुलाई' केली आणि त्याचे कपडे फाडले  असल्याचे नागरिकांनी सांगितले.

अशी घडली घटना

फिर्यादी पती आणि पत्नी काम करत असलेल्या कंपनीमध्येच सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या रघुवेंद्र उपाध्याय याने पीडित महिलेला लग्न करण्याची गळ घातली. मात्र, तिने माझे लग्न झाले असून दोन मुले असल्याचे सांगून नकार दिला. काही दिवस हे प्रकरण बंद होते. मात्र, आरोपीने महिलेसोबत मोबाईलवर बोलणे सुरू केले. रघुवेंद्र तिला व्हिडिओ कॉल करून धमकी देत होता. व्हिडीओ कॉल केला नाही तर तुझ्या पतीला जीवे मारेन म्हणून धमकी देत होता. त्यामुळे तिने घाबरून व्हिडीओ कॉल केला. हा प्रकार त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. हा प्रकार तिने पतीला सांगितला. मात्र, जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे दोघेही गप्प बसले. त्यानंतर आरोपीने 30 डिसेंबर 2022 ला अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच 4 जानेवारीला सुद्धा तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. त्यावरुन पोलिसांत तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी करण्यात आली.

अटकेसाठी मांडला होता ठिय्या

आरोपीला अटक करण्यात यावी, याकरिता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोटघरे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तक्रार न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी तसेच आरोपीला अटक होत नाही तोवर हलणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या नातेवाइकांनी घेतली. यामुळे तणावाचे वातावरण होते.

ही बातमी देखील वाचा...

नागपूरकरांनी अनुभवली थंडगार रात्र; पहिल्यांदाच पारा 8 अंशांवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election bycott Voting : काम होत नाही, नागरिक संतापले; मतदानावर बहिष्कार
Loksabha Election bycott Voting : काम होत नाही, नागरिक संतापले; मतदानावर बहिष्कार
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Rishabh Pant :रिषभ पंतचा महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट, धडाकेबाज खेळीनं टीकाकारांची तोंड बंद, पाहा व्हिडीओ
Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kolhapur Ambabai Nagar Pradakshina : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळाSandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagarsix thousand Busses Loksabha Eleciton : लोकसभेच्या कामासाठी ६ हजार बसेस, प्रवाशांचे हाल होणारTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election bycott Voting : काम होत नाही, नागरिक संतापले; मतदानावर बहिष्कार
Loksabha Election bycott Voting : काम होत नाही, नागरिक संतापले; मतदानावर बहिष्कार
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Rishabh Pant :रिषभ पंतचा महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट, धडाकेबाज खेळीनं टीकाकारांची तोंड बंद, पाहा व्हिडीओ
Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
Maharashtra Weather : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
शिरुरमधून मुख्यमंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, पण...अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
शिरुरमधून मुख्यमंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, पण...अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
Horoscope Today 25 April 2024 : आजचा गुरुवार खास! मेष, वृषभसह 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
आजचा गुरुवार खास! मेष, वृषभसह 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
Embed widget