एक्स्प्लोर

इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, त्यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट

Ladki Bahin Yojana : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण संदर्भातील वक्तव्य असणारा भाजप आमदाराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नागपूर : महाराष्ट्र सरकारनं लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महिलांना आर्थिक स्वरुपात मदत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता. आता काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओचा आधार घेत वडेट्टीवार यांनी राज्य सरकावर हल्लाबोल केला आहे. महायुतीला मतांचा दुष्काळ असल्यानं लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला  जुगाड आहे,हे भाजप आमदारानं मान्य केल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. 

विजय वडेट्टीवार काय म्हणाले? 

अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. 

भाजप आमदारानं काय म्हटलं? 

आम्ही कशासाठी इतकी मोठी भानगड केली आहे, तुम्ही  सांगा, इमानदारीनं सांगा, अंत:करणातून सांगा, इतकी मोठी भानगड कशासाठी केलीय. ज्या दिवशी तुमच्या घराच्या पुढं इलेक्शनची पेटी येईल त्यावेळी माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल. यासाठी आम्ही हे जुगाड केलं आहे. सर्वजण खोटं बोलले असतील, मी खरं बोलतोय. माझं खरं आहे की नाही, बोलायचं एक करायचं एक, मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे, असं कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी केलं. 

लाडकी बहीण योजनेबाबत आमदारांच्या वक्तव्यानं यापूर्वीही वाद 

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वकांक्षी योजना आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी निवडणुकीनंतर स्क्रूटिनी कमिटीची बैठक आहे, त्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतून तुमची नावं डिलीट करण्यात येतील असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तर रवी राणा यांनी आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं म्हटलं होतं. 

इतर बातम्या :

Ravi Rana : 'लाडकी बहीण'बाबत पैसे काढून घेण्याचं ते वक्तव्य गंमतीने केलं होतं, रवी राणांचे स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter: कुछ तो गडबड है दया... बदलापूर प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर की कट? सीआयडी करणार तपास
कुछ तो गडबड है दया... बदलापूर प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर की कट? सीआयडी करणार तपास
'राऊतांनीच उबाठा गटाचा एन्काऊंटर केलाय, त्याची सुपारी शरद पवारांनी दिली होती'; शिंदेंच्या सेनेचा पलटवार
'राऊतांनीच उबाठा गटाचा एन्काऊंटर केलाय, त्याची सुपारी शरद पवारांनी दिली होती'; शिंदेंच्या सेनेचा पलटवार
मुंबईतील 'या' जागेसाठी फहद अहमद इच्छुक; महाविकास आघाडीतून जागा सोडण्याची मागणी
मुंबईतील 'या' जागेसाठी फहद अहमद इच्छुक; महाविकास आघाडीतून जागा सोडण्याची मागणी
Success story: धाराशीवच्या माळरानावर सिताफळाची सेंद्रीय शेती! शेतकऱ्याला 10 लाखाहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा
धाराशीवच्या माळरानावर सिताफळाची सेंद्रीय शेती! शेतकऱ्याला 10 लाखाहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

दुपारी 3 च्या हेडलाईन्स:  ABP Majha Marathi News : Headlines 3 PM Headlines : 24 September 2024Raj Thackeray Meet Salman Khan : सलमान खानच्या निवासस्थानी राज ठाकरे पोहोचलेAkshay Shinde Encounter : फॉरेन्सिक टीम करणार एन्काऊंटर झालेल्या ठिकाणाची पाहणीSushma Andhare : अक्षयला तळोजामधून बदलापूरला न्यायचं होतं मग गाडी मुंब्राकडे का नेली? अंधारेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Encounter: कुछ तो गडबड है दया... बदलापूर प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर की कट? सीआयडी करणार तपास
कुछ तो गडबड है दया... बदलापूर प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर की कट? सीआयडी करणार तपास
'राऊतांनीच उबाठा गटाचा एन्काऊंटर केलाय, त्याची सुपारी शरद पवारांनी दिली होती'; शिंदेंच्या सेनेचा पलटवार
'राऊतांनीच उबाठा गटाचा एन्काऊंटर केलाय, त्याची सुपारी शरद पवारांनी दिली होती'; शिंदेंच्या सेनेचा पलटवार
मुंबईतील 'या' जागेसाठी फहद अहमद इच्छुक; महाविकास आघाडीतून जागा सोडण्याची मागणी
मुंबईतील 'या' जागेसाठी फहद अहमद इच्छुक; महाविकास आघाडीतून जागा सोडण्याची मागणी
Success story: धाराशीवच्या माळरानावर सिताफळाची सेंद्रीय शेती! शेतकऱ्याला 10 लाखाहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा
धाराशीवच्या माळरानावर सिताफळाची सेंद्रीय शेती! शेतकऱ्याला 10 लाखाहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा
Ajit Pawar: एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं महत्त्वाचं भाष्य, अक्षय शिंदेच्या पत्नीचा दाखला देत नेमकं काय म्हणाले?
एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं महत्त्वाचं भाष्य, अक्षय शिंदेच्या पत्नीचा दाखला देत नेमकं काय म्हणाले?
नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली
नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' ट्रेडिंग; सोशल मीडियावर जोरदार समर्थन
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' ट्रेडिंग; सोशल मीडियावर जोरदार समर्थन
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत महिलांनी फोडला टाहो
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत महिलांनी फोडला टाहो
Embed widget