Vijay Wadettiwar : सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातच्या चरणी अर्पण केलाय, म्हणून महाराष्ट्राची आर्थिक अधोगती: विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar: देशाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्र 11व्या स्थानावर आहे. या जोडतोड सरकारने महाराष्ट्राची आर्थिक अधोगती केलीय. अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राची अधोगती होत आहे, हा आरोप आम्ही करताना, भाजप आणि सरकार आमचे आरोप खोटे आहे असे खंडन करत होते. मात्र आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा रिपोर्ट महाराष्ट्राची आर्थिक घसरण किती झाली हे स्पष्ट करणारा आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्र क्रमांक एकवर होता. मात्र मागील दहा वर्षात विविध क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. जीडीपी मध्ये प्रचंड घट झाली असून आता 15.2% वरून 13% वर आला आहे. तेलंगणा , गुजरात, कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू, पंजाब ही राज्ये आपल्या पुढे गेले आहे. या जोडतोड सरकारने महाराष्ट्राची आर्थिक अधोगती केली आहे. देशाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्र 11व्या स्थानावर आहे. अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.
गेल्या दशकात महाराष्ट्रात 20 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असताना यांना लाज नाही. महाराष्ट्राला खड्ड्यात टाकून, आर्थिक दृष्ट्या उध्वस्त करून हे मत मागत फिरत आहे. महाराष्ट्राचे स्वाभिमान गुजरातच्या चरणी अर्पण केला आहे. हेच या अहवालातून स्पष्ट होत आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
जिथे एबी फॉर्म हेलिकॉप्टरने पाठवलं जातं, तिथे....
हेलिकॉप्टर ममधून पैसे पोहोचवण्याचे काम झाले आहे. शरद पवार जे म्हणाले हे खरं आहे. अनेक ठिकाणी हे पकडले गेले आहे. हेलिकॉप्टर म्हणून पैसे पोहोचवण्याचा काम झाले असून बॅगा उचलायला दोन दोन माणसं लागतात का? नियमांचा, आचारसंहितेचा भंग करून पैशाच्या बळावर सत्ता काबीज करायला हे निघाले आहे आणि त्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. जिथे एबी फॉर्म हेलिकॉप्टरने पाठवलं जातं, तिथे पैसा पाठवण्यासाठी पोलिसांच्या गाडीचा वापर होणार नाही हे कशावरून. अशी शंका ही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केली आहे.
बहुजनांना वापरायचं आणि फेकायचं ही भाजपची पॉलिसी- विजय वडेट्टीवार
धरलं तर चावतंय, सोडलं तर पडतंय, 100% अजित पवारांचे स्थिती अशी झाली आहे. ते कुठेही गेले तरी खड्ड्यात पडणार अशी अवस्था त्यांची करून ठेवली आहे. त्यामुळे जयंत पाटील जे बोलले, ते चांगल्या शब्दात बोलले आहे. ही ब्लॅकमेलिंग नाही, तर हवं त्या पद्धतीने अजित पवारांचा वापर करून घेतला जात आहे. बहुजनांना वापरायचं आणि फेकायचं ही भाजपची पॉलिसीच आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. लोकसभेत यांनी एक एक मतदारसंघात 50-50 कोटी रुपये खर्च केले, तरी पडले. हे काय गाफील राहणं आहे का. सरकार विरोधात असंतोष होता, तो लोकसभेत दिसून आला आणि त्यापेक्षा दुप्पट असंतोष विधानसभेमध्येही दिसून येईल. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा