एक्स्प्लोर

Vidarbha Rains : विदर्भातील नऊ जिल्ह्यांनी ओलांडली पावसाची सरासरी, यवतमाळमध्ये 36 तर भंडाऱ्यात सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक पाऊस

Vidarbha Rains :  विदर्भातील नऊ जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. विदर्भात 1 जून ते 27 जुलैपर्यंत 495.8 मिमी पाऊस झाला आहे, या कालावधीत 446 मिमीच्या अपेक्षेपेक्षा सरासरी 11 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

Vidarbha Rains : सुरुवातीला कमजोर ठरलेल्या पावसाने (Rain) जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सर्व उणीव भरुन काढली आहे. विदर्भातील (Vidarbha) नऊ जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. केवळ अमरावती आणि अकोल्यात पाऊस सरासरीपेक्षा खाली असला तरी सामान्य आहे. विदर्भात 1 जून ते 27 जुलैपर्यंत 495.8 मिमी पाऊस झाला आहे, या कालावधीत 446 मिमीच्या अपेक्षेपेक्षा सरासरी 11 टक्के अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये यवतमाळ 36 तर भंडाऱ्यात सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

विदर्भात 27 जुलैपर्यंत झालेला पाऊस 

शहर            मिमी         सरासरी     टक्के 
नागपूर          485           441         7 
गडचिरोली     665          584         16 
चंद्रपूर           595         495         18 
भंडारा           620         489         25
वर्धा              420          398        03
गोंदिया          560          555        01 
यवतमाळ       519          394       36
अमरावती       327         374     उणे 13
अकोला         330         333      उणे 3
बुलढाणा        307         297        03
वाशिम          404         379         07

शहर             मिमी         सरासरी     टक्के 
नागपूर                485           441      7 
गडचिरोली    665        584        16 
चंद्रपूर        595         495         18 
भंडारा             620                  489             25
वर्धा              420                  398            03
गोंदिया              560                    555            01
यवतमाळ      519            394        36
अमरावती        327           374      उणे 13
अकोला           330              333       उणे 3
बुलढाणा             307               297              03
वाशिम                404            379       07

Buldhana Rains : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी, आलेवाडी गावात शिरलं अनेक घरात पाणी 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात रात्री पुन्हा अतिवृषटीमुळे अनेक नदी ओढ्याना पूर आल्याने नागरिकांनी जीव मुठी धरुन रात्र काढल्याच चित्र आहे. संग्रामपूर परिसरात सातपुडा डोंगर परिसरात काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला. तालुक्यातील पांडव नदीसह अनेक ओढ्यांना पूर आल्याने शेगाव जळगाव जामोद मार्ग काही काळ बंद होता तर आलेवडी गावात पुराचं पाणी शिरल्याने अनेक घर जलमय झाले होते. आलवाडी ग्रामपंचायत इमारतीत दोन ते तीन फूट पाणी शिरल्याने मोठ नुकसान झालं आहे. तर काही कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.

Gadchiroli Rains : तेलंगणातील कडेम आणि श्रीपदा एल्लमपल्ली धरणातून विसर्ग, गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याला फटका बसणार

तेलंगणा राज्यात ढगफुटीसारखा 600 मिमी इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रच्या सीमेवर असलेल्या भूपालपल्ली जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो घरे पाण्याखाली आली आहेत. तेलंगाणा राज्यातील कडेम आणि श्रीपदा एल्लमपल्ली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. त्याचा फटका हा थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला बसणार आहे. सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदी आहे आणि या पुराचे पाणी आता गोदावरीला येऊन मिळणार आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात जिल्हाधिकारी संजय मीना यांनी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. वॉर रुममधून याकडे लक्ष ठेवून आहे. काल मध्यरात्रीच्या दरम्यान गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सिरोंचा तालुक्यातील असरल्लीमध्ये 164.8 मिमी इतका पाऊस पडला. तालुक्यातील 4 गावांतील 330 लोकांना सुरक्षित स्थळी हवण्यात आले आहे.

Bhandara Rains : भंडाऱ्यात विजांच्या प्रचंड कडकडाटासह रात्रभर जोरदार पाऊस

हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला गुरुवारी ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. मात्र, दिवसभर प्रखर ऊन आणि उकाडा असल्याने नागरिक हैराण झाले होते. गुरुवारी रात्री ढगांचा गडगडाट आणि विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाला असून पहाटेपर्यंत कुठे हलका तर कुठे रिमझिम सुरु आहे. रात्रीच्या जोरदार पावसाने भंडाऱ्यातील बैरागी वाडा परिसरातील सखल भाग जलमय झाला होता. पाऊस कमी झाल्याने आता पाणी ओसरलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget