एक्स्प्लोर

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी फुलले विदर्भाचे काश्मीर...

सर्वजण सध्या नववर्षाच्या स्वागताची तयारी करत आहेत. कोणी जंगी पार्टीचा प्लॅन करतंय तर कोणी फिरण्याचा. तुम्हीही असा काही प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी विदर्भाचे काश्मीर चांगला पर्याय ठरू शकतो.

नागपूर : 2019 वर्ष संपायला अवघे काही तास उरले आहेत. नववर्षाच्या सेलिब्रेशनला कुठंतरी लांब जावं आणि मनमुराद आनंद नववर्षाच्या स्वागताचा घ्यावा असा तुम्ही प्लॅन करत असेल तर त्यासाठी योग्य स्थळ आहे ते म्हणजे विदर्भाचं काश्मीर म्हणून ओळख असलेलं चिखलदरा. सध्या राज्यात थंडीने जोर धरला असून चिखलदरामध्ये तर दिवसभर थंड वारे वाहू लागले आहे. सध्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांच्या गर्दीने विदर्भाचे काश्मीर फुलून गेले आहे. दूरवर पसरलेली धुक्याची चादर, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वत रांगा, हजारो फूट उंचीवरुन कोसळणारे धबधबे, नागमोडी रस्ता, वातावरणात गारवा हाड गोठवणारी थंडी, मेळघाटातील चिखलदरा मधील सध्या राज्यात थँडीची लाट सुरू आहे. अशातच आधीच थंड वातावरण असलेल्या चिखलदरामध्ये थंडीने उच्चांक गाठला आहे. याच थंडीत चिखलदऱ्याचे सौंदर्य आणखी फुलले आहे. साधारणता जुलै महिन्यापासून चिखलदरा मधील पर्यटन हे सुरू होत असते. सध्या वातावरणात असलेला गारवा याचा आनंद लुटन्यासाठी त्यात ख्रिसमस नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राज्यभरातून पर्यटक दाखल झाले आहे. हेही वाचा - नागपुरात सुमारे 500 गुंडांचे नवीन वर्ष पोलीस ठाण्यातच उजळणार निसर्गात असलेली अद्भुत किमया इथं अनुभवायला मिळत असल्याचं पर्यटक सांगतात. चिखलदरामध्ये देवी पाईट, गाविडगड किल्ला तर अक्षरशः गर्दीने फुलून गेला आहे. उंच पहाळावर असलेली घोडा सवारी, उंट सवारी, सायकल सवारी यामुळे पर्यटकाची पसंती देवी पॉईन्टला दिसून येत आहे. विदर्भाच्या या काश्मीरमध्ये विविध पाहण्याजोगे पॉईन्ट आहे. देवी पॉईन्ट लगत असलेल्या तलावावर बोटिंगचा आनंद घेता येतो. दैनंदिन कामात महिला वर्षभर व्यस्त असतात पण चिखलदरामध्ये आलो की वर्षभराचा ताण निघून जाऊन नवीन शक्ती या निसर्गातून मिळते असल्याचे महिला पर्यटक सांगतात. समुद्र सपाटीपासून हजारो किलोमीटरवर असलेलं चिखलदरा हे पर्यटकांना भूरळ पाडणारे आहे. सोबतच जवळच असलेले सीमाडोह आणि जंगलातील हत्ती सफारी साठी प्रसिद्ध असलेले कोलकास येथे पर्यटक जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात. निसर्गाचा हा अदभूत नजरा साक्षात अनुभवायचा असेल आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनचा विचार तुमच्या मनात सुरू असेल तर तुम्ही चिखलदरा प्लॅन करायला हरकत नाही. Marriage Issue | विदर्भातील शेतकरी मुलांना नवरी मिळेना | नागपूर | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Embed widget