एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीने बोलावली राज्य कार्यकारिणीची तातडीची बैठक; प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाकडे सऱ्यांचेच लक्ष

Nagpur News : वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक उद्या, 26 डिसेंबरला नागपुरात होते आहे. या बैठकी मधून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

नागपूर : आगामी  लोकसभा निवडणुकीला  (Lok Sabha Election) अवघे काही महिने उरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोट बांधणीला सुरुवात केली आहे. एकीकडे 'इंडिया आघाडी' (I.N.D.I.A.) तर दुसरीकडे एनडीएतील (NDA) पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. अशात आता  वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) राज्य कार्यकारिणीची बैठक उद्या, मंगळवार 26 डिसेंबरला  नागपूरात पार पडणार आहे. या बैठकी मधून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील 30 लोकसभा जागांवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने आता पर्यंत सातत्याने भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत पत्र व्यवहार आणि आपल्या भाषणातून जाहीरपणे एकत्र येण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आता कितपत यश येतंय याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र आता तातडीने बोलावण्यात आलेल्या या राज्य कार्यकारिणीची बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर काय मोठा निर्णय घेतील याकडे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

नागपुरात 26 डिसेंबरला होणार राज्य कार्यकारिणीची बैठक

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी 'अ‍ॅक्टिव्ह मोड' वर आली असून ठिकठिकाणी सभा, मेळावे घेण्याचे काम सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे आजपासून नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात आज होणाऱ्या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेला ते उपस्थित राहणार आहे. त्यानंतर उद्या 26 डिसेंबरला नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची तातडीने बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज्यभरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत पत्र व्यवहार आणि जाहीरपणे सांगून एकत्र येण्याची इच्छा दर्शवली आहे. परंतु, वंचितच्या प्रयत्नांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ‘वंचित’ ला आता यावर आपली भूमिका घ्यावी लागत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलंय. 

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सऱ्यांचे लक्ष

वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून इंडिया आघाडीचा भाग बनण्याची इच्छा दर्शवली होती. परंतु, काँग्रेसकडून कुठलीही हालचाल होतांना दिसत नाहीये. वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मागील 20  दिवसांत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची ही दुसरी बैठक आहे. मागील बैठक 5 डिसेंबर रोजी मुंबईत झाली होती. यात लोकसभा निवडणुकीची रणनिती आणि रोडमॅप विषयी चर्चा झाली होती. त्यामुळे 26  डिसेंबरला होणाऱ्या हा बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे काय भूमिका घेतात याकडे सऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget