एक्स्प्लोर

Unseasonal Rain in Vidarbha : अवकाळी पाऊस, गारपीटीने विदर्भाला झोडपलं; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Unseasonal Rain in Vidarbha : अवकाळी पावसाने विदर्भाला अक्षरशः झोडपून काढले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Unseasonal Rain in Vidarbha : अवकाळी पावसाने विदर्भाला (Unseasonal Rain)अक्षरशः झोडपून काढले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील (Vidarbha) शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आगामी 15 फेब्रुवारीपर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ते विरळ पावसासह गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्यात (Bhandara) मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपीट  झाली. यात मोठ्या प्रमाणात शेत पिकांचं नुकसान झालं आहे. भंडाऱ्याच्या पहेला क्षेत्रातील चोवा, नवरगाव आणि परिसरातील गावातील नागरिकांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या अवकाळी पावसानं रब्बी हंगामातील गहू, धान पीक, चना इत्यादींसह पालेभाजी पिकांना मोठा फटका बसला आहे. टोमॅटो, वांगी, फळबागा या गारपीटमुळं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. तर, काही कौलारू घरांनांही नुकसानीचा सामना करावा लागला आहे. या अवकाळी पावसामुळं शेतकरी पुरता हतबल झाला असल्याचे चित्र आहे. 

अमरावती जिल्ह्यात धामणगाव तालुक्याला झोडपले

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्याला अवकाळी पावसासह गारपट्टीचा मोठा फटका बसला. धामणगाव तालुक्यातील देवगाव, तळेगाव, दशासर परिसरामध्ये गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. धामणगाव तालुक्याला दुपारच्या सुमारास पडलेले गारपीटीचा प्रचंड फटका बसला. त्यामुळे भाजीपाला, फळबागांचे नुकसान झालं आहे. शिवाय आज देखील सकाळपासून हवेत गारठा वाढला असून सर्वत्र धुक्याची चादर पसरली असल्याचे चित आहे.  

वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील विरखेडे, वाटखेड, गोंधळी, घारपळ या गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तूर, हरभरा, गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान झालं आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये गारपीट झाली. त्यामुळे चना, गहू पिके संकटात सापडली आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. वर्धाच्या देवळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. गारांच्या पावसाने पिके जमीनदोस्त झाली आहेत. देवळी तालुक्यातील भिडी, तळणी, आकोली, लोणी, आगरगाव या भागात सर्वाधिक पाऊस झाला असून चणा, गहू, तूरीचे मोठे नुकसान झालं आहे. आज सकाळपासून वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरण  होते.

सोमवारीही याच जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारीही काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण असणार आहे. विदर्भात 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या पाच दिवसात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Mumbai Local MegaBlock: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, माटुंगा ते ठाणे धीम्या मार्गावर, तर सांताक्रूझ ते गोरेगाव जलद मार्गावर ब्लॉक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी,ड्रेसकोडही ठरलाAjit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रहीGadchiroli Earthquake | गडचिरोलीत सकाळदरम्यान भूकंपाचे धक्के, CCTV व्हिडिओ!Earthquake Bhandara | गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के, तेलंगणात भूकंपाचं केंद्रस्थान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Embed widget