एक्स्प्लोर

Nagpur : देशातील पहिले फोर लेव्हल वाहतूक कॉरिडॉर नागपुरात, पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन; काय आहेत वैशिष्ट्ये

Nagpur : देशात प्रथमच चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉर साकारण्यात येत असून ते जमिनीपासून 28 मीटर उंचीवर थेट रेल्वे ट्रॅक ओलांडून 18.9M रुंद स्टील गर्डरमधून तयार झाले आहे.

PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 11 डिसेंबर रोजी नागपुरात समृद्धी महामार्गासह (Samruddhi Mahamarg) मेट्रो फेज-1 च्या उर्वरित मार्गांचे उद्घाटन करणार आहे. त्यांच्या हस्ते कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक (रीच 2) आणि झाशी राणी चौक ते प्रजापती नगर (रीच-3) हा मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉरचे (four level transportation corridor) उद्घाटन हे एक प्रमुख आकर्षण ठरणार असून ते जमिनीपासून 28 मीटर उंचीवर थेट रेल्वे ट्रॅक ओलांडून 18.9M रुंद स्टील गर्डरमधून तयार झाले आहे. असे बहुस्तरीय परिवहन नेटवर्क देशात प्रथमच पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सद्यस्थितीतील वाहतूक आणि पादचारी भुयारी मार्ग हा सर्वात खालचा स्तर आहे तर त्याच्या वरती असलेला रेल्वे ट्रॅक हा दुसरा स्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो मार्ग अनुक्रमे तिसरा आणि चौथा स्तर तयार करतील. तो एकूण 5.3 किमी असेलल्या आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्टचा (double decker viaduct) भाग आहे. अफकॉन्सने दोन महिन्यांच्या विक्रमी वेळेत 1,650 MT वजनाचा हा 80 M डबल-डेकर स्टील स्पॅन उभारला आहे. गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर जिथून दररोज 150 हून अधिक रेल्वे आणि एक लाखाहून अधिक वाहने जातात त्यावरती स्टील सुपरस्ट्रकचर (steel superstructure) ठेवण्यात आले आहे. अवाढव्य 18.9 M रुंद गर्डरचे लाँचिंग (girder launching) ही भारतीय रेल्वेतील बहुधा पहिलीच घटना ठरणार आहे.

8,000 स्ट्रक्चरल घटकांसह 1,650MT स्ट्रक्चरल स्टीलसह तयार केलेला डबल-डेकर ओपन वेब गर्डर (OWG) हा गेल्या हिवाळ्यात गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर ठेवण्यात आला होता. स्पॅन (span) जमिनीपासून 28 मीटर उंचीवर आहे. इतकं आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या कामाचा भारतात यापूर्वी कधीही प्रयत्न झाला नसल्याचा दावा अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण कुमार यांनी केला. ते म्हणाले. 80 M स्टील स्पॅन व्यतिरिक्त, प्रत्येकी 25 M असणारे स्पॅन आरसीसी डेक स्लॅबसह दोन कंपोझिट गर्डरने पूर्ण करणे आवश्यक होते. पूर्वतयारीच्या टप्प्यात, टीमने साइटवरील जागेची अडचण, तीव्र हिवाळा, अवेळी पाऊस, कोरोना महामारी तसेच मुदतीमध्ये प्रकल्पाची तांत्रिक गुंतागुंत हाताळली.

प्रकल्पासाठी 'या' सोयी ठरल्या महत्वाच्या

चार 250-500 टन क्रेन, एक सुपर लिफ्ट व्यवस्था, 22 टॉर्क रेंच मशीन (torque wrench machines) तैनात करण्यात आल्या होत्या आणि संपूर्ण ऑपरेशनसाठी विशेष लोअरिंग व्यवस्था करण्यात आली होती. नागपूर मेट्रोच्या फेज-1 मध्ये 39 किमी एलिव्हेटेड कॉरिडॉरचा समावेश आहे. अफकॉन्सने 17.1 किमी बांधले आहे आणि एकूण सिव्हिल कामाच्या (civil works) जवळपास 51% आहे. सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्ट व्यतिरिक्त, अफकॉन्सने रीच-2 आणि रीच-1 मध्ये आठ स्थानके आणि दोन डेपो देखील बांधले आहेत. अफकॉन्सने बांधलेले सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन हे भारतातील सर्वात उंच मेट्रो इंटरचेंज स्टेशन आहे.

ठळक वैशिष्ट्ये

  • नागपुरात आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्ट (5.3 किमी) बांधला आहे.
  • पहिला स्तर राष्ट्रीय महामार्गासाठी तर दुसरा स्तर मेट्रोसाठी असेल
  • चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉर गड्डीगोदाम क्रॉसिंग येथे आहे
  • यामध्ये वाहन आणि पादचारी भुयारी मार्ग, रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो यांचा समावेश असेल.
  • ही अनोखी व्यवस्था 5.3 किमी मेट्रो-कम-राष्ट्रीय महामार्ग डबल-डेकर व्हायाडक्टचा भाग आहे.
  • भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच 18.9 मीटर रुंद स्टील गर्डरचे 28 मीटर उंचीवर थेट रेल्वे रुळांवर लाँचिंग करण्यात आले आहे.

ही बातमी देखील वाचा

Nagpur: अभिमानास्पद...! नागपूर मेट्रोच्या 'डबल डेकर व्हाया-डक्ट'ला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Crime Special Report : दिल्ली ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा खुलासा, कुणी रचला बनाव?
Gangaram Gavankar : ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर अनंतात विलीन
MCA Election Row: 'असा कोणताही ठराव मंजूर नाही', MCA निवडणुकीवरून 28 Clubs आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला
BEST Fleet: '...आधीच्या सरकारने Best ला West केले', DCM Eknath Shinde यांचा मागील सरकारवर निशाणा
CNAP Mandate: 'आता मोबाईलवर दिसणार कॉलरचे खरे नाव', Spam Calls आणि फसवणुकीला बसणार चाप!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Mohammad Shami : मोहम्मद शमीचा सलग दुसऱ्या रणजी सामन्यात धमाका, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, आगरकरसह निवड समितीचं टेन्शन वाढलं
मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
Embed widget