एक्स्प्लोर

Sushma Andhare: 'अजून 5-50 जीव गेले तरी काय फरक पडतो?', नागपुरातील खून प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Sushma Andhare on Nagpur Murder Case: लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात पुरला. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे, या घटनेवरून अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे.

नागपूर: मागील काही दिवसांमध्ये राज्यात अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशातच लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह प्रियकराने जंगलात पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. मानकापूर पोलिसांनी आरोपी प्रियकर महेश केशव वळसकर याला अटक केली आहे. आरोपीने खून केल्याची कबुली दिली असून आज पुरलेला मृतदेह काढण्यात येणार आहे. प्रिया बागडी ऊर्फ प्रिया गुलक असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रिया गेल्या सहा वर्षांपासून येथे कुटुंबापासून वेगळी राहते. ती १६ तारखेपासून अचानक बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिच्या आईने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

देवेंद्र फडणवीस साहेब आपण राजीनामा देवूच नका. अजुन 5-50 जीव गेले तरी काय फरक पडतो? असा खोचक टोला देखील अंधारेंनी (Sushma Andhare)लगावला आहे. त्यांनी यासंबधीत बातमीचा फोटो शेअर करून राज्याच्या गृहमंत्र्यांनी धारेवर धरलं आहे. यासंबधी पोस्ट त्यांनी  त्यांच्या सोशम मिडिया अकाऊंटवरती शेअर केली आहे. सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare), "नागपूर मध्ये पोहोचले आणि विमानतळावर पत्रकारांनी बातमी दिली. मानकापूर जवळ 24 वर्षीय तरुणीचा बलात्कार करून खून करून मृतदेह पुरला गेला. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आपण राजीनामा देवूच नका. अजुन 5-50 जीव गेले तरी काय फरक पडतो?" अशी खोचक पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये त्यांनी फडणवीसांना देखील टॅग केलं आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?

लग्नासाठी मागे तगादा लावला म्हणून प्रियकारने प्रेयसीचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलामध्ये पुरला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली असून मानकापूर पोलिसांनी  प्रियकराला अटक केली. पोलिसांनी खाक्या दाकताच त्याने खून केल्याची कबुली दिली. आज (बुधवारी) पुरलेला मृतदेह काढण्यात येणार आहे. महेश केशव वळसकर (57, रा. न्यू सोमवारीपेठ, सक्करदरा) असे आरोपी प्रियकराचे, तर प्रिया बागडी ऊर्फ प्रिया गुलक (24) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

मृत प्रिया गेल्या काही वर्षांपासून कुटुंबापासून वेगळी राहत होती. ती गेल्या 16 तारखेपासून बेपत्ता झाली होती. तिचा फोन बंद येत असल्यामुळे तिच्या आईने तिच्या राहत्या ठिकाणी चौकशी केली. घराला कुलूप दिसल्याने तिने शेजाऱ्यांकडे चौकशी केली. ती आठवडाभरापासून घरी नसल्याची माहिती आईला मिळाली. त्यामुळे आईने मानकापूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिचे लोकेशन तपासले. तिचे शेवटी लोकेशन रामटेकमधील एका हॉटेलमध्ये आढळून आले. ते हॉटेल आरोपी महेशच्या मालकीचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेशसोबत तिचे गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती नेहमी महेश या हॉटेलमध्ये मुक्कामी राहत होती. तिचा संपूर्ण खर्च महेश करत होता. गेल्या महिनाभरापासून प्रिया लग्नासाठी महेशच्या मागे तगादा लावत होती. मात्र, विवाहीत असलेला महेश लग्न करण्यासाठी तयार नव्हता.

महेशने गळा आवळून केला खून

आरोपी महेशची दूधाची भूकटी तयार करण्याची कंपनी होती. तिथे प्रिया काम करत होती. तेव्हापासून दोघांची ओळख झाली. कंपनीतच प्रेमसंबंध जुळले. गेल्या तीन दिवसांपूर्वी प्रिया महेशच्या हॉटेलवर गेली. तिथे तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. त्यामुळे त्याच रात्री महेशने तिचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिला हॉटेलपासून तीन किमी अंतरावर जंगलात पुरलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ganesh Visarjan Vadapav : गणेश विसर्जन मिरवणुकीत 5 लाख वडापावचं होणार वाटप ABP MAJHAABP Majha Headlines : 06 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Tambdi Jogeshwari Ganpati : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जनPraniti Shinde on Ganpati Visarjan : सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदेंनी केले बाप्पाचे विसर्जन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
Embed widget