एक्स्प्लोर
Advertisement
सॅनिटायझिंग टनेल मानवी शरीराला नुकसानकारक! तज्ञांचा दावा
सॅनिटायझिंग टनेलचा धोका लक्षात आल्यानंतर दक्षिण भारतातील अनेक शहरांनी त्याचा वापर बंद केला आहे.त्यात वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे ते शरीराला अपायकारक तर नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे.
नागपूर : कोरोनाशी लढताना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक नवनवीन युक्त्या केल्या जात आहेत. गेले काही दिवस देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटायझिंग टनेल उभारून त्याच्या माध्यमातून संपूर्ण शरीर निर्जंतुक करण्याची उपाययोजना सर्वत्र अमलात आणली जात आहे. पोलीस विभागाने तर अनेक पोलीस स्टेशनमध्ये तसेच त्यांच्या काही वाहनांमध्ये हे सॅनिटायझिंग टनेल तयार केले आहे. मात्र, हे सॅनिटायझिंग टनेल खरोखर परिणामकारक आहेत का? किंबहुना त्यात वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे ते शरीरा ला अपायकारक तर नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे. तज्ञ डॉक्टर्सकडून एबीपी माझाने हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वेगळेच सत्य समोर आले.
सॅनिटायझिंग टनेलमधून स्वतःचे संपूर्ण शरीर फवारणीच्या माध्यमातून सॅनिटाईझ करून घेतले जात आहे. फक्त नागपूरचं नव्हे तर संपूर्ण राज्यात पोलीस स्टेशन्स च्या समोर असे सॅनिटायझिंग टनेल सध्या पाहायला मिळतायेत. तर इतर अनेक कार्यालयांच्या समोर, भाजी मंडीच्या प्रवेश दारावर, इतर सार्वजनिक ठिकाणी ही हे टनेल उभारण्यात आले आहे. मात्र, जागतिक आरोग्य संस्थेने नुकतच या टनेलच्या वापराबद्दल काही सूचना केल्या आहेत.
काय आहे जागतिक आरोग्य संस्थेचं मत
सॅनिटायझिंग टनेलमध्ये फवारणीसाठी वापरले जाणारे सोडियम हायपोक्लोराईड आणि हॅड्रोजन पेरॉकसाईड सारखे केमिकल हे मानवी शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात. सोडियम हायपोक्लोराईड हे केमिकल विविध पृष्ठभाग जसे जमीन, दार, दाराचे व खिडक्यांचे हॅण्डल, कारच्या दारावरील हॅण्डल हे निर्जंतुक करण्यासाठी सूचित केले गेले आहे. ते ही 0.50 टक्के एवढ्या कमी प्रमाणात असते. सोडियम हायपोक्लोराइड सारखे केमिकल कधीही मानवी शरीर निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाऊ नये. शरीरावर कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल किंवा क्लोरीनची फवारणी केल्याने शरीरात आधीच प्रवेश केलेले विषाणू मारले जाऊ शकत नाही.
तज्ञ डॉक्टर्सच्या मते सोडियम हायपोक्लोराईड, हायड्रोजन पेरॉकसाईड किंवा क्लोरीन सारखे केमिकल्स शरीरावर फवारल्याने त्वचेवर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. शिवाय त्यामुळे नाक आणि डोळ्यातील म्युकस मेम्ब्रेनला नुकसान होतो. जास्त प्रमाणात असे केमिकल नाकातून शरीरात गेल्याने श्वसन यंत्रणेत त्रास जाणवतो. शिवाय तोंडावाटे पोटात हे केमिकल्स गेल्याने मळमळ, उलटी होणे असे त्रास होऊ शकतात.
सॅनिटायझिंग टनेल फक्त शरीरावरच दुष्परिणाम करतात असे नाही. तर त्यामधून गेल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या मनात सुरक्षिततेची एक खोटी भावना तयार होते. त्यामुळे तो व्यक्ती कोरोनाच्या धोक्याबद्दल मानसिक दृष्ट्या काहीसा सावध होऊ शकतो. परिणामी कोरोना पासून बचावाच्या खऱ्या उपयांकडे म्हणजेच वारंवार हात धुणे, मास्क घालणे याकडे त्याचा दुर्लक्ष होऊ शकतो. लक्षणीय बाब म्हणजे सध्या सॅनिटायझिंग टनेलचा सर्वाधिक वापर पोलीस विभागात केला जात आहे.
अनेक पोलीस स्टेशनच्या दारावर हे टनेल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पोलीस विभागाने स्वतःच्या गाड्यांना सॅनिटायझिंग रूम सारखे वापरणे सुरु केले आहे. कदाचित सतत सॅनिटायझिंग टनेल किंवा सॅनिटायझिंग रूमचा वापर केल्यामुळे पोलीस कोरोनासंदर्भात सुरक्षिततेच्या इतर उपयांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? त्यामुळेच पोलीस विभागात अचानक कोरोनाच्या रुग्णांचं प्रमाण तर वाढलं नाही ना? अशी शंका ही व्यक्त केली जात आहे.
सॅनिटायझिंग टनेलचा हा धोका लक्षात आल्यानंतर दक्षिण भारतातील अनेक शहरांनी त्याचा वापर बंद केला आहे. तामिळनाडूच्या पब्लिक हेल्थ अॅन्ड प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन विभागाने त्याचा वापर बंद करण्याचे आदेश दिले आहे. विशाखापट्टणम महापालिकेने ही त्याचा वापर बंद केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement