Samruddhi Mahamarg Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह... समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Samruddhi Mahamarg Nagpur Live Updates : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

Background
PM Modi to visit Maharashtra Nagpur: आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. अवघ्या काही तासांनी पंतप्रधानांच्या हस्ते 55 हजार कोटींचा खर्च असलेला समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे... समृद्धी महामार्गावर पंतप्रधानांच्या आगमन आणि उपस्थितीच्या वेळी या ठिकाणी काही वेळासाठी सर्वांनाच प्रवेश बंद राहणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा 2 ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधानांनीच जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत. नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय वन हेल्थ संस्था , नागपूर आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत.
PM Modi LIVE : नागपुरातून पंतप्रधान मोदी लाईव्ह... मराठीतून भाषणाला सुरुवात...
नागपुरातून पंतप्रधान मोदी लाईव्ह... मराठीतून भाषणाला सुरुवात...

Breaking News : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह...
Breaking News : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह...
LIVE UPDATES#BreakingNews : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह...#PMModi #SamruddhiMahamarg#Maharashtra #Nagpur https://t.co/AVmE2W0N1t pic.twitter.com/MLWuLFhT6s
— ABP माझा (@abpmajhatv) December 11, 2022























