NMC Nagpur : नागरी समस्या निवारण केंद्रांद्वारे आतापर्यंत 609 तक्रारींचे निराकरण
प्लास्टिक बंदीच्या निर्णया नंतर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कारवाईचा धडाका लावला आहे. याअंतर्गत 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच 78 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
नागपूर : नागरिकांच्या मुलभूत तक्रारींच्या अनुषंगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे झोनस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षांना 'नागरी समस्या निवारण केंद्र' म्हणून कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गुरुवारी 18 ऑगस्ट पर्यंत झोन स्तरावर नागरी समस्या निवारण केंद्रांमध्ये 945 तक्रारी प्राप्त झालेल्या असून आतापर्यंत दहाही झोनमधील 609 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
नागरिकांना भेडसावणाऱ्या सिवेज, पाणी, स्वच्छता, पथदिव्यांबद्दलच्या तक्रारी नोंदविण्यासाठी नागरी समस्या निवारण केंद्र उघडण्यात आले आहे. त्याचा फायदा आज नागरिकांना होताना दिसून येत आहे.
एक तास वीज दिवे बंद करा, उर्जा वाचवा ; 'पौर्णिमा दिवसा' निमित्त सावरकर चौकात जनजागृती
'या' झोनमध्ये सर्वाधिक तक्रारी
आतापर्यंत लक्ष्मीनगर झोनमध्ये प्राप्त एकूण 181 तक्रारी मधून एकूण 58 तक्रारी, धरमपेठ झोनमधील 107 तक्रारींपैकी 84 तक्रारी, हनुमाननगर झोनमधील 291 तक्रारीपैकी सर्व 271 तक्रारी, धंतोली झोनमधील 111 तक्रारीपैकी 38 तक्रारी, नेहरुनगर झोनमधील 79 तक्रारीपैकी 55 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच गांधीबाग महाल झोनमधील 48 तक्रारीपैकी 35 तक्रारी, सतरंजीपूरा झोनमधील 45 तक्रारीपैकी 26 तक्रारी, लकडगंज झोनमधील 09 तक्रारीपैकी 07 तक्रारी, आसिनगर झोनमधील 55 तक्रारीपैकी 23 तक्रारी, मंगळवारी झोनमधील 19 तक्रारीपैकी 12 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित झोन कार्यालयात नोंदवून मनपाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
NMC Elections : विविध उपक्रमांद्वारे प्रभागात माहोल निर्मितीला सुरुवात, नोव्हेंबरमध्ये मनपा निवडणुकीचे संकेत
सहा प्रतिष्ठानांवर कारवाई 35 हजारांचा दंड वसूल
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, धंतोली, गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 78 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत महाजन मार्केट, सीताबर्डी येथील दर्पण इन्टरप्राईज या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील बंडु पत्तल शॉप या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मोमीनपुरा, टिमकी येथील के.जी.एन.प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत मेहंदीबाग रोड, बिनाकी मंगलवारी येथील जय जलाराम अगरबत्ती कारखाना यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.