एक्स्प्लोर

शिवसेनेच्या नागपूर शहर प्रमुखावर खंडणीचा गुन्हा दाखल

गेल्या आठवड्यात शिवसेना प्रणित युवासेनेचा जिल्हाध्यक्ष विक्रम राठौडच्या विरोधात अजनी पोलीस स्टेशनमध्ये एका फायनान्स कंपनीच्या संचालकाकडून 15 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप लागला होता.

नागपूर : शिवसेना प्रणित युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षाचं खंडणी प्रकरण ताजं असताना आता शिवसेनेच्या शहर प्रमुखावर धमकावून खंडणी मागणे, संपत्तीवर अवैध कब्जा करणे, ती रिकामी करण्यासाठी पुन्हा खंडणी मागणे, दुकान आणि फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करणे असे अनेक आरोप लागले आहे. मंगेश कडव असं आरोप लागलेल्या शिवसेना शहर प्रमुखाचं नाव असून तो सध्या फरार आहे.

सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या युवा नेत्यांवर सध्या नागपुरात गुन्हे दाखल होण्याची जणू मालिकाच सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना प्रणित युवासेनेचा जिल्हाध्यक्ष विक्रम राठौडच्या विरोधात अजनी पोलीस स्टेशनमध्ये एका फायनान्स कंपनीच्या संचालकाकडून 15 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप लागला होता. ते प्रकरण थंड होत नाही त्याच्या आधीच शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश कडव अडचणीत सापडले आहे. मंगेश कडवच्या विरोधात नागपूरच्या अंबाझरी, सक्करदरा, हुडकेश्वर, बजाजनगर पोलीस स्थानकात गेले अनेक दिवस तक्रारी येत होत्या. पोलिसांनी सर्व तक्रारींचा तपास करून तीन प्रकरणांमध्ये मंगेश कडव याच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.

शिवसेना नागपूर शहर प्रमुखाविरोधात दाखल झालेले गुन्हे

प्रकरण पहिले - पुराणिक लेआऊटमध्ये एका घराचा अवैध ताबा घेतला. ताबा सोडण्याच्या मोबदल्यात मूळ मालकाला मारहाण करत त्याच्याकडून दीड कोटींची खंडणी मागितली. या प्रकरणी अंबाझरी पोलीस स्थानकात मारहाण करत खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे.

प्रकरण दुसरे - मानेवाडा परिसरात तीन दुकानं खरेदी करण्यासाठी देवा शिर्के या तक्रारकर्त्याने 18 लाख रुपये दिल्यानंतरही मंगेश कडवने दुकानाचे विक्रीपत्र केले नाही आणि परस्पर त्याचं दुकान बँकेत गहाण ठेऊन बँकेतूनही 50 लाखांचं कर्ज उचललं. याप्रकरणी सक्करदरा पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुंडा दाखल आहे.

प्रकरण तिसरे - मानेवाडा परिसरातील एका फ्लॅटच्या विक्रीमध्ये मंगेश कडवने फसवणूक केल्याची तक्रार दिनेश आदमने नावाच्या तक्रारकर्त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर तपास करत पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. याशिवाय अनेक प्रकरण पोलिसांच्या तपासात असल्याची ही माहिती आहे...

दरम्यान, शिवसेनेने त्याच्या पदाधिकाऱ्यांवर लागत असलेल्या आरोपांवर सावध भूमिका घेतली आहे. पोलिसांनी जरी गुन्हे दाखल केले असले तरी सध्या तपास सुरु आहे. कायदा आपलं काम करेल असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान यामागे कोणाचा कट कारस्थान आहे का असा संशय ही शिवसेनेनं व्यक्त केला आहे.

गेले अनेक वर्ष भाजपसोबत असलेल्या शिवसेनेला उपराजधानीतील राजकारणात फारसे वाव नव्हते. मात्र शिवसेना आणि भाजपची वाट वेगळी झाल्यानंतर शिवसेनेने नागपुरात आपला विस्तार करण्याची संधी निर्माण झाली. पक्षाने तसे प्रयत्नही सुरु केले. मात्र पक्षाच्या काही नेत्यांवर लागणारे असे गंभीर आरोप उपराजधानीत शिवसेनेची वाट आणखी बिकट करणारे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget