मोठी बातमी! नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार सुपारी किलिंग प्रकरण; बड्या काँग्रेस नेत्याचं नाव समोर
Purushottam Puttewar Murder Case: संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात मदत केल्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे.
Nagpur Purushottam Puttewar Murder Case: नागपूर : नागपूरच्या (Nagpur News) पुरुषोत्तम पट्टेवार हत्याकांड प्रकरणात (Purushottam Puttewar Murder Case) गडचिरोलीच्या (Gadchiroli) देसाईगंज येथील एका काँग्रेस (Congress) नेत्याचं नाव पुढे येत आहे. आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याचा माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात मदत केल्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे.
कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. अजनी पोलिसांनी तडकाफडकी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुरुषोत्तम त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना आणि मुलगी योगिता आहे. सुक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार याचा मोठा भाऊ प्रविणची योगिता ही पत्नी असून तिने पार्लेवारच्या संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरू केला होता.
पुरुषोत्तम पट्टेवार हत्याकांड प्रकरणाशी काँग्रेस नेत्याचं कनेक्शन काय?
नागपूरच्या पुरुषोत्तम पट्टेवार हत्याकांड प्रकरणात गडचिरोलीच्या देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचे नाव पुढे येत आहे. या काँग्रेस नेत्याला गडचिरोलीमध्ये कोळसा पट्टा हवा होता, तर अर्चना पट्टेवार ला आपली बदली हि प्रमोशन सह चांगल्या जागेवर पोस्टिंग हवी होती त्यामुळे हे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याचा माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात मदत केल्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा २२ मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता.
अजनी पोलिसांनी तडकाफडकी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुरुषोत्तम त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना व मुलगी योगिता आहे. सुक्ष्म-लघू व मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार याचा मोठा भाऊ प्रवीणची योगिता ही पत्नी असून तिने पार्लेवारच्या संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरु केला होता.
अपघात नसून सुपारी किलिंग असल्याचा उलगडा कसा झाला?
कधीही कोणत्याही मित्राला दारू न पाजणारा, कधी ही मित्रांना पार्ट्या न देणारा आणि नेहमीच लोकांकडून पैसे उसने मागणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला, दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला. त्यामुळे काहींना त्याच्यावर शंका आली. खबऱ्यांमार्फत चिल्लर गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलीस कामाला लागले.
पोलिसांनी निरजच्या अवतीभवती खबरी पेरले. एका अपघाताच्या प्रकरणातून नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कुठे अपघाताचं प्रकरण घडून अजूनही आरोपी चालक सापडलेले नाही, याची माहिती घेणं सुरू केलं आहे. तेव्हा बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी नीरज निमजेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या केल्याची कबुलीच नीरज निमजेनं दिली. त्यामुळे एका भुरट्या गुन्हेगारानं दिलेल्या काही महागड्या पार्ट्या अपघातातून घडवलेल्या हत्येचा प्रकरण सर्वांसमोर आणण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :