Nagpur News : फुटाळा फाऊंटनच्या उद्घाटनाला पंतप्रधान येणार ; फेब्रुवारीत कार्यक्रम, अनेक मान्यवरांशीही संपर्क
Nagpur : अमिताभ बच्चन यांना निमंत्रित करण्यात येत आहे. याशिवाय संगीतमय कारंजामध्ये प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत आहे. त्यांनीदेखील उद्घाटनाला उपस्थित राहावे, असा प्रयत्न सुरू आहे.
Futala Musical Fountain Nagpur : फुटाळा तलावात साकारला गेलेल्या संगीत कारंजाचे रखडलेले उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) येणार आहेत, अशी माहिती नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांनी दिली. नासुप्र मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली.
मागील नागपूर दौऱ्यात पंतप्रधानांनी फुटाळा कारंजाचे उद्घाटन करण्याबाबत संकेत दिले होते. आता पंतप्रधान मोदी (Narendra Modi) फेब्रुवारी महिन्यात नागपूरला येण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्यात फुटाळा संगीतमय कारंजाचे उद्घाटन करण्याबाबत विचार सुरू आहे. या कार्यक्रमासाठी नागपूरचा इतिहास डब करणारे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना निमंत्रित करण्यात येत आहे. त्यांच्याशी मी स्वत: संपर्क केला आहे. याशिवाय संगीतमय कारंजामध्ये प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत आहे. त्यांनीदेखील उद्घाटनाला उपस्थित राहावे, असा प्रयत्न सुरू आहे.
हे संगीतमय कारंजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही म्युझिकल फाऊंन्टेन पाहून संकल्पना करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या व्हिजनचे कौतुक केले होते. याशिवाय शहरात येणारे जवळपास प्रत्येक नेते येथे भेट देत आहेत. दुसरीकडे 'ट्रायल शो' साठीच्या पासेसही तयार करण्यात आल्या असून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांना पासेस देऊन आपला जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जगातील सर्वात उंच इमारत दुबईतील बुर्ज खलिफाला अगदी लागून असलेल्या जगप्रसिद्ध म्युझीकल फाऊंन्टेला बघण्यासाठी दरवषीं जगभरातील लाखो पर्यटक पोहोचतात. याच धरतीवर याची निर्मिती करण्यात आली आहे.
50 ते 100 रूपये तिकीट शुल्क
नासुप्रने कंत्राटदाराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा संगीत कारंजा तयार केला. इंग्रजीत अमिताभ बच्चन, हिंदीत गुलजार आणि मराठीत नाना पाटेकर यांचा व्हॉईस ओव्हर आहे. ए.आर. रहमान यांचे संगीत. ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर रेसूल पोकुट्टी यांचे ध्वनी सिंन्क्रोनाईझेशन आहे. कारंजे सर्वांसाठी सुरू झाल्यावर 50 ते 100 रुपयांदरम्यान तिकीट ठेवले जाणार आहे. या संदर्भात नासुप्रचे विश्वस्त मंडळ दर लवकरच ठरवणार आहे.
असा आहे प्रकल्प
- 12 माळयाची इमारत, 1100वाहन पाकिंग व्यवस्था
- इमारतीत फुडपार्क, मॉल, 11 व्या माळयावर मल्टीफ्लेक्स
- 12व्या माळयावर फिरते रेस्टॉरेंट
- 2 मेगावॅट वीजेची खपत
- बॉटनीकल उद्यानाचा किनाऱ्यावर चौपाटीचा प्रस्ताव
ही बातमी देखील वाचा...