एक्स्प्लोर

चितळेंच्या नावाने बनावट गुलाबजाम, नागपुरातील कारखान्यावर पोलिसांची कारवाई

नागपूर पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी दीपक तलरेजा यांच्यासह विक्रीत मदत करणारा जयेश लखनानी या दोघांना अटक केलं आहे. विशेष म्हणजे अनेक वर्ष याची विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही नकली गुलाबजाम मिक्सची पाकीटं ओळखणे शक्य होत नव्हतं.

नागपूर : बाजारात नामांकित कंपनी चितळे फूड्सचे नकली गुलाबजाम मिक्स विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी चितळेच्या गुलाबजाम मिक्ससारखी हुबेहूब पॅकिंग असलेले नकली गुलाबजाम मिक्सची पॅकेट्स जप्त केली आहेत. ज्याठिकाणी याची निर्मिती केली जात होती तो नागपुरातील कारखानाही पोलिसांनी सील केला.

नागपूरच्या कळमना परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेले काही दिवस विदर्भातील बाजारात चितळे फूड्सच्या नावाने काहीसा स्वस्त गुलाबजाम मिक्स सर्रास विकला जात होता. चितळे फूड्सच्या व्यवस्थापनाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे त्याची तक्रार दिली.

तक्रारीची दखल घेत पोलिसांनी चौकशी करत कळमना परिसरातील विजयनगरमधील नकली गुलाबजाम मिक्स बनवणारा कारखाना शोधून काढला. या कारखान्यात अत्यंत घाणीत हे गुलाबजाम मिक्स तयार केले जात होते. डालडा, पामोलिन तेल, दुय्यम दर्जाचा मैदा ही सामग्री वापरून मोठ्या आकाराच्या कुलरच्या टाकीमध्ये हे पदार्थ मिसळले जाते होते. त्यानंतर मशिन्सच्या मदतीने हुबेहूब चितळे फूड्सच्या इंस्टंट गुलाबजाम मिक्ससारखी पॅकिंग करुन ते बाजारात विक्रीला पाठवले जायचे.

नागपूर पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी दीपक तलरेजा यांच्यासह विक्रीत मदत करणारा जयेश लखनानी या दोघांना अटक केलं आहे. विशेष म्हणजे अनेक वर्ष याची विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही नकली गुलाबजाम मिक्सची पाकीटं ओळखणे शक्य होत नव्हतं. त्यामुळे दोन महिन्याच्या कालावधीत हे नकली गुलाबजाम मिक्स विदर्भातील आणि महाराष्ट्रातील बाजारात पसरले गेले होते.

बनावट गुलाबजाम मिक्स पॅकेट कसे ओळखाल?

- असली पॅकेटवरील गुलाबजामचं चित्र फिक्कट रंगाचं आहे. - नकली पॅकेटवरील गुलाबजामचं चित्र गडद रंगाचं आहे. - असली पॅकेटच्या पाठीमागे सोनेरी पट्टीवर कंपनीची माहिती आणि बॅच नंबर लिहिलेले आहे. - तर नकली पॅकेटच्या पाठीमागे सोनेरी पट्टीवर काहीच लिहिलेले नाही. - असली पॅकेटवर इंग्रजीच्या स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका नाहीत. - नकली पॅकेटवर मात्र इंग्रजी आणि व्याकरणाच्या चुका आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar : मंत्री होताच पदाचा रूबाब; नवी मुंबई पोलिसांची झाडाझडतीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat visit Hostel : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून वसतीगृहाची पाहणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Embed widget