(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Special Trains : 32 अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेनचे नियोजन, 13 सप्टेंबरपासून धावणार गणपती फेस्टिव्हल ट्रेन
नागपूर - मडगाव दरम्यान 32 पैकी काही विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. त्यात नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनच्या सहा फेऱ्यांचा समावेश असणार आहे.
नागपूर: गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना आपआपल्या गावी जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनचे नियोजन चालविले आहे. त्यानुसार, यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान 32 विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
द्विसाप्ताहिक गणपती फेस्टिव्हल स्पेशल
नागपूर - मडगाव दरम्यान 32 पैकी काही विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. त्यात नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनच्या सहा फेऱ्यांचा समावेश असणार आहे. 01139 गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन 13, 17 आणि 20 सप्टेंबरला नागपूरहून दुपारी 3.05 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता मडगाव (गोवा) येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे 01140 गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन 14, 18 आणि 21 सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता मडगाव येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 9.30 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.
MPSC Recruitment : एमपीएससीतर्फे 961 जागांची मेगा भरती; उद्या, 21 ऑगस्टला होणार राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा
अतिरिक्त कोच लावणार
या सर्व विशेष रेल्वेगाड्यांसाठी रिझर्वेशन तिकीटचे बुकिंग रेल्वे प्रशासनाने दीड महिन्यापूर्वीच अर्थात 8 जुलैपासून सर्व आरक्षण केंद्र आणि वेबसाईटवर सुरू करण्याची घोषणा केली होती. याशिवाय प्रवाशांची गर्दी आणखीच वाढली तर काही रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच लावण्याचेही रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.
'त्या' रेल्वेगाड्यांमध्ये बदल नाही
या स्पेशल ट्रेन व्यतिरिक्त यापूर्वी रेल्वे प्रशासनाने 74 गणेश फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा केली होती. तूर्त त्यांची वेळ, थांबे आणि इतर बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Education : शाळेत शिकविणार 'सैनिकांचे शौर्य', नवे शैक्षणिक धोरणानुसार होणार बदल
62 रेल्वेगाड्या रद्द, 21 ते 31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांचे होणार हाल
नागपूर: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या मार्गाशी संबंधित सुरू असलेल्या कामामुळे 62 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 21 ते 31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. नागपूरमधून जाणार्या प्रमुख गाड्या पुढीलप्रमाणे आहेत: 21 ते 28 ऑगस्ट ट्रेन क्रमांक 12130/12129 हावडा-पुणे, 18109/18110 टाटा-इतवारी, 12810/12809 हावडा-सीएसएमटी , 12833/12809/12809 हावडा, अहमदाबाद-12809/12809 -शालीमार कोलकाता रद्द होईल. तसेच 12262 हावडा-सीएसएमटी दुरांतो 22,23, 24, 26 ऑगस्ट, 12261 सीएसएमटी-हावडा दुरांतो 23, 24, 25, 28 ऑगस्ट, 12222 हावडा-पुणे दुरांतो 20, 25, 27 ऑगस्ट, पुणे-1222 तसेच 29 ऑगस्ट, 22846 हटिया - पुणे 22, 26, 29 ऑगस्ट, 22845 पुणे - हटिया 24, 28, 31 ऑगस्ट, 12880 भुवनेश्वर -एलटीटी 22, 25, 29 ऑगस्ट, 12879 एलटीटी - भुवनेश्वर 24,27, 31 रोजी धावणार नाहीत. त्याचप्रमाणे 20822 संत्रागाछी-पुणे हमसफर एक्सप्रेस 20, 27 ऑगस्ट, 20821 पुणे-संत्रागाची 22 आणि 29 ऑगस्ट रोजी रद्द राहतील. प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.