Nitin Gadkari : तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी लोक ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील - नितीन गडकरी
Nagpur : लोकसभा निवडणुकीपूर्वी एक लाख जणांना रोजगार देणार, गडकरींची घोषणा
Nitin Gadkari, Nagpur Latest Marathi News : भारतामध्ये सध्या ड्रोन क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. त्यामुळे तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी ड्रोनमध्ये बसून लोक विमानतळावर जातील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरमधील पाच हजार तरुणांना लवकरच नोकऱ्या मिळतील, असेही सांगितलं.
ड्रोनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होतं आहे. त्यामुळे तो दिवस दूर नाही जेव्हा चारजण ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील, असा नवा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. ते नागपूरात फॉरच्युन फाउंडेशनच्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. गडकरी यांच्या या दाव्याची सध्या चर्चा होत आहे. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, आज शेतीची फवारणी असो अथवा डोंगरावरुन वजनी साहित्य खाली उतरविणे असो... अनेक कामे ड्रोनमुळे कमी पैशात होत आहेत. त्यामुळे भविष्यात ड्रोन क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसं बसून काही अंतरावर सहज जाऊ शकतील.
5 हजार जणांना नोकऱ्या -
लवकरच नागपुरातील मिहानमध्ये इन्फोसिसचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे जवळपास 5 हजार नागपूरकरमधील तरुणांना नोकऱ्या मिळतील, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केला.
एक लाख जणांना रोजगार, गडकरींचा संकल्प -
नागपूरातील विशेष आर्थिक क्षेत्र मिहानमध्ये 31 मार्चला इन्फोसिसच उदघाटन करणार आहे. त्यातून 5 हजार नागपूरकर तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. मिहानच्या माध्यमातून आतापर्यंत 87 हजार जणांना रोजगार मिळाला असून पुढील लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापुर्वी 1 लाख लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळेल, असा संकल्प केल्याचेही यावेळी गडकरी म्हणाले. राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी उद्योग आले पाहिजेत. उद्योग व्यापार वाढला तर रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्मितीच्या नवनवीन संधी शोधल्या पाहिजेत.
प्लॅस्टिकपासून पेट्रोल -
प्लॅस्टिकपासून क्रूड पेट्रोल काढण्याचा नवीन प्रकल्प सुरू करत आहे. पुढील तीन महिन्यात प्रकल्प सुरू होईल, अशी आपेक्षा आहे. हे पेट्रोल डिझेलध्ये वापरता येईल. त्यावर ट्रक, बस चालू शकेल.
Addressing Concluding Ceremony of Youth Empowerment Summit, Nagpur https://t.co/7wOISod7IX
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 19, 2023
आणखी वाचा -