(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आम्हाला राम मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान हवंय; नक्षलवाद्यांचा राम मंदिर उद्घाटनाला विरोध
नक्षलवाद्यांच्या "क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेने" हे पत्रक काढून राम मंदिर उद्घाटन सोहळ्यांनी सर्वांनी बहिष्कार टाकावा असा इशाराच दिला आहे.
नागपूर: राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन अवघ्या काही तासांवर आले आहे. तसंच देशात राम मंदिर संदर्भातील अनेक वाद उकरून काढले जात आहेत की काय असा संशय निर्माण होतोय. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राजकीय विरोध सुरू असताना, आता नक्षलवाद्यांनीही (Naxal) राम मंदिराच्या उद्घाटनाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेने राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घाला अशी मागणी करणारा पत्रकच काढले आहे. राम महिला विरोधी होते, राम राज्य आदर्श राज्य नव्हत अशी जहाल भाषा या पत्रकात आहे. दरम्यान पोलीस आणि नक्षल चळवळीचे तज्ञ यांना यामागे नक्षलवाद्यांचे विशिष्ट रणनीतिक आणि आर्थिक हेतू असल्याचं वाटतंय..
अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा बहिष्कार करा.. आम्हाला मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय.. अशा आशयाचा पत्रक काढून नक्षलवाद्यांच्या महिला आघाडीने राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. नक्षलवाद्यांच्या "क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेने" हे पत्रक काढून राम मंदिर उदघाटन सोहळ्याचे सर्वांनी बहिष्कार करावे असा इशाराच दिला आहे.
राम मंदिराच्या विरोधात प्रपोगंडा सुरू
दरम्यान, नक्षलवाद्यांचे दंडकारण्य क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन एक प्रतिबंधित संघटन असून एकेकाळी गडचिरोली नक्षल प्रभावित गडचिरोली आणि छत्तीसगडमधील बस्तर परिसरात या संघटनेचे एक लाखापेक्षा जास्त सदस्य होते. या महिला संघटनेच्या माध्यमातून जहाल महिला नक्षल कमांडर्स आदिवासी क्षेत्रातील महिलांची माथी भडकवायचे, त्यांना राज्यघटना आणि शासनाविरुद्ध सशस्त्र लढा लढण्यासाठी नक्षल चळवळीमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रेरित करायचे..एका प्रकारे वन क्षेत्रात राहणाऱ्या गरीब आदिवासी महिलांचा ब्रेन वॉश करणारे हा संघटन असून आता विशिष्ट रणनीतिक हेतूने त्यांनी राम मंदिराच्या विरोधात प्रपोगंडा सुरू केल्याचं पोलिसांना वाटत आहे.
दंडकाऱ्यांनी क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेच्या पत्रकात फक्त राम मंदिरावर बहिष्कार घालण्याची सूचना करण्यात आलेली नाही तर प्रभू श्रीरामाबद्दल जहाल भाषेचा वापर करत श्रीराम स्त्रीविरोधी आदिवासी विरोधी होते त्यांचा राम राज्य कुठूनही आदर्श राज्य नव्हता अशी जहाल भाषा वापरण्यात आली आहे.
2 हजार 260 किलोमीटर लांबीचा निर्माण करणार राम वन गमन पथ
अयोध्येत भव्य श्री राम मंदिराचा निर्माण होत असताना मोदी सरकारने अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत वनवासाच्या काळात ज्या ज्या भागातून श्रीराम गेले होते. त्या परिसरात 2 हजार 260 किलोमीटर लांबीचा "राम वन गमन पथ" निर्माण करण्याचा निर्णय केला आहे.
राम वन गमन पथ योजना काय आहे
- वनवासाच्या काळात श्रीराम अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत ज्या भागातून गेले त्या मार्गावर राम वन गमन पथ योजना राबवली जाणार..
- या मार्गाची एकूण लांबी 2260 किलोमीटर आहे.
- ज्या भागात प्रभू श्रीराम थांबले होते त्या परिसराचा विकास या योजनेत केला जाणार..
- राम वन गमन पथ मार्गाचा मोठा भाग छत्तीसगडच्या उत्तर सीमेपासून दक्षिण सीमेपर्यंत गेलेला आहे..
- याच मार्गावर नक्षलवाद्यांचा प्रभावक्षेत्र असलेले सुकमा, नारायणपूर, बिजापूर, जगदलपूर, बस्तर हे जिल्हे आहे..
- एकूणच राम वन गमन पथ नक्षलवाद्यांना त्यांच्या प्रभावक्षेत्रात विकासाच्या नव्या योजना आणणारा मार्ग बनेल आणि त्यांचा प्रभाव कमी होईल असं वाटतंय.
- नक्षलवाद्यांना आपल्या प्रभावक्षेत्रात राम वन गमन पथ नको आहे.. याच भागात नक्षलवाद्यांची सर्वात उत्कृष्ट गोरिल्ला आर्मी "कंपनी वन" तैनात आहे. त्यामुळेच नक्षलवादी प्रपोगंडाच्या माध्यमातून राम वन गमन पथ आणि श्रीरामाला बदनाम करत आहेत.
राम मंदिराचा उद्घाटन अयोध्येत होत असलं, तरी त्याच्याशी संबंधित लाखो छोटे-मोठे कार्यक्रम देशातील प्रत्येक शहरात, गावात, खेड्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या महिला संघटनेने काढलेला पत्रक आणि त्यातील धमकी वजा भाषा पोलिसांना अलर्ट करणारी आहे. राम मंदिराचा जल्लोष होत असताना कुठेही अप्रिय घटना होणार नाही यासाठी महाराष्ट्र पोलीस दक्ष आहेत.