एक्स्प्लोर

Nagpur : तब्बल 110 कोटी रुपये खर्चून भव्य पोलीस भवन बांधलं, पण पहिल्याच पावसात छत कोसळलं

Nagpur Police Bhavan : नागपुरातील भव्य पोलीस भवनाचे उद्घाटन होऊन 26 दिवस झाले नाही तोवरच त्याचं छत कोसळलं आहे. 

नागपूर: एखादी इमारत एकशे दहा कोटी रुपये खर्चून उभारली आहे असं म्हटल्यावर तुमच्या नजरेसमोर कदाचित एखाद्या भव्य दिव्य महालाची प्रतिमा उभी राहील. नागपुरात एकशे दहा कोटी खर्चून उभारलेले पोलीस भवन ही दिसायला तेवढेच भव्य दिव्य. मात्र, एका पावसाने या भव्य दिव्य महालाची पोलखोल केली आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे या इमारतीचे फॉल सिलिंगचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात दिमाखात उभ्या असलेल्या पोलीस भवनाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन 29 एप्रिलला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडले. देखणी आणि भव्य वास्तू पाहून अजितदादाही तिच्या प्रेमात पडले होते आणि राज्यातील सर्वात देखणी पोलीस वास्तू असे प्रमाणपत्रच त्यांनी दिले.      

मात्र केवळ 26 दिवसानंतर अवघ्या अर्धा तास बरसलेल्या पावसाने आणि मध्यम स्वरूपाच्या वाऱ्याने या इमारतीची आतून वाईट अवस्था केली. काल संध्याकाळी चार ते साडेचार दरम्यान बरसलेल्या पावसामुळे पोलीस भवनाच्या दोन्ही विंगमध्ये पहिल्या, तिसऱ्या चौथ्या आणि सहाव्या माळ्यावरचे फॉल्स सिलिंग खाली कोसळले. सुदैवाने यात कोणताही कर्मचारी जखमी झाले नाही. मात्र, उद्घाटनाला अवघे 26 दिवस झालेल्या इमारतीत असे काही घडू शकेल याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तब्ब्ल दोन लाख चौरस फूट एवढा प्रचंड चटई क्षेत्र (कार्पेट एरिया) असलेली ही इमारत आहे ही तेवढीच खास आहे. 

पोलीस भवनाची खास वैशिष्ट्यं
 
- सहा मजल्यांच्या पोलीस भवनात नागपूरचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्यासह पोलीस उपायुक्तांचे कार्यालय.
- नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस दलातील विशेष शाखा, वाहतूक नियंत्रण कक्षासह इतर सर्व शाखांच्या कार्यालयंही याच इमारतीत आहेत.
- इमारतीतील ए विंग नागपूर शहर पोलीस दलाची तर बी विंग नागपूर ग्रामीण पोलीस दलाची आहे. 
- इमारतीमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी अद्यावत हॉल्स आहेत. 
- तसेच छोट्या कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सोय असलेले ऑडिटोरियम ही इमारतीत आहे. 
- इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कॅफे, महिलांसाठी वेगळे कॉमन रूम आहेत.
- पूर्ण इमारतही सेंट्रली एअर कुल्ड आहे.
- इमारतीच्या समोर आणि मागे पुरेशा पार्किंग एरिया आणि परिसराची हिरवळ या इमरतीचे खास वैशिष्ट्य आहे.       
- इमारतीचे बांधकाम पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ यांनी मेहता कन्स्ट्रक्शन या खाजगी कॉन्ट्रॅक्टरकडून करून घेतले आहे.

आता एवढ्या सोयींनी सुसज्ज इमारतीत एका पावसाने आणि मध्यम स्वरूपाच्या वाऱ्याने असे थैमान का घडले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे उत्तर कदाचित इमारतीच्या डिझाईन मध्येच असावे. चौकोनी स्वरूपात बांधलेल्या या इमारतीच्या मधल्या भागात मोकळी जागा आहे. याच मोकळ्या जागेच्या वरती (सहा मजल्यांच्यावर) डोम बनवण्यात आले आहे. त्या डोममधून इमारतीत नैसर्गिक उजेड आणि वारा खेळता राहावा यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. त्याच जागेतून वादळाच्या वेळेला वारा आत शिरून अवतीभोवतीच्या सहाही मजल्यांवर वारा शिरतो अशी शक्यता आहे.

मंगळवारच्या पावसानंतर ज्या-ज्या मजल्यावर फॉल्स सिलिंग खाली पडली आहे, त्या ठिकाणी दुरुस्तीचे कार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच थोड्याशा पावसाने इमारतीत झालेल्या नुकसानीची माहिती संबंधित कंत्राटदाराला देण्यात आली आहे. आता कंत्राटदार आणि बांधकाम तज्ज्ञ इमारतीत सोसाट्याचा वारा आत शिरणार नाही यासाठी काय उपाय योजतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र, अवघ्या 26 दिवसात 110 कोटींच्या इमारतीत असे घडणे योग्य नाही हे गृह विभागाने लक्षात घेणे गरजेचे आहे.     

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis:भोंग्याला सरसकट परवानगी नाही, उल्लंघन केल्यास परवानगी कायमची रद्द :देवेंद्र फडणवीसJitendra Awhad On Nitesh Rane : मच्छी कशी कापणार, हलाल की झटका?  : जितेंद्र आव्हाडMaharashtra Anandacha Shidha | आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्याचा सरकारचा निर्णयBhaskar Jadhav On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार : भास्कर जाधव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
राजकारण्यांचा नावडता, अधिकारी चळाचळा कापतात त्या तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार? अंजली दमानियांच्या मागणीने चर्चांना उधाण
सरकार बीडमध्ये तुकाराम मुंढेंची नियुक्ती करणार का? अंजली दमानियांच्या मागणीने चर्चांना उधाण
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
Guillain Barre Syndrome : नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती
Embed widget