Nagpur News: महिलेला चिरडून पळाला, पोलिसांनी 23 दिवसांनी पकडलं, मात्र केवळ नोटीस देऊन सोडलं, नागपूरच्या पोलिसांचा कारनामा
अपघातानंतर तीन आठवड्यांनी नागपूर पोलिसांनी कार आणि दोषी चालकाचा शोध लावला. मात्र या महिलेला धडक देणाऱ्या आरोपीला केवळ नोटीस देऊन सोडून दिला. त्यामुळे कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जातयं.
नागपूर : पुण्याच्या अपघात प्रकरण ताजे असताना आता नागपुरात महिलेला कार खाली चिरडणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी (Nagpur Police) केवळ नोटीस देऊन सोडून दिलंय. नागपुरात 7 मे रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला चिरडून का कार चालक पळून गेला होता. या अपघातत महिला गंभीर जखमी झाली होती. या अपघातानंतर तीन आठवड्यांनी नागपूर पोलिसांनी कार आणि दोषी चालकाचा शोध लावला. मात्र या महिलेला धडक देणाऱ्या आरोपीला केवळ नोटीस देऊन सोडून दिला. त्यामुळे कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जातयं.
शारदा चौकात ममता आदमने या मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेला धडक देऊन कारखाली चिरडून पळाल्याची घटना घडली होती. 7 मे रोजी नागपूरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत शारदा चौकावर झालेल्या हिट अँड रन अपघातात ममता आदमने या 45 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. कार चालकाने त्यांना आणि धडक दिल्यामुळे आणि नंतर कार खाली चिरडल्यामुळे ममता यांच्या शरीरातील अनेक हाडे मोडली होती. शर्थीचे प्रयत्न करून अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवला. मात्र, अजूनही तीन महिने त्यांना अंथरुणावर राहावे लागणार आहे. अपघाताच्या तीन आठवडा नंतरही नागपूर पोलीस संबंधित कार आणि दोषी कारचालकाचा शोध लावण्यात यशस्वी ठरले नव्हते.
अद्याप अंथरुणाला खिळून
अपघातात गंभीर जखमी झालेल्या ममता आदमने यांना टप्प्याटप्प्याने दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीराच्या अनेक हाड या अपघातात तुटल्या. त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ममता आदमने यांचा जीव तर वाचवलाय. मात्र प्रचंड वेदनेत ममता आदमने सध्याही अंथरुणाला खिळून आहेत. डॉक्टरांच्या मते पुढील तीन महिने त्या आपल्या पायावर उभे राहू शकणार नाही आणि चालूही शकणार नाहीयेत. त्यानंतर पुन्हा सामान्य जीवन जगण्यासाठी त्यांना अनेक महिने वाट पाहावी लागणार आहे.
दोषी कारचालकाला नोटीस देऊन सोडल्याची माहिती
एबीपी माझा ने काल या घटनेला वाचा फोडत ममता आदमने यांची विदारक स्थिती दाखवली होती. दरम्यान कायद्यात असलेली प्रक्रिया पूर्ण करून दोषी कारचालकाला नोटीस देऊन सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे... या अपघातात नियमाप्रमाणे कारवाई केल्याचाही पोलिसांचा दावा आहे.
हे ही वाचा :