एक्स्प्लोर

दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी; त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात

Dhamma Chakra Pravartan Divas: दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर शहरात अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. मोठ्या संख्येनं अनुयायी दीक्षाभूमीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांची तगडी सुरक्षा आहे.

Nagpur News Updates: दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त (Dhamma Chakra Pravartan Divas) शहराची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त संपूर्ण शहरात अनेक कार्यक्रमांची रेलचेल असल्याने पोलिसांचा कस लागणार आहे. या दरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पोलिस विभागाने कंबर कसली आहे. या दोन दिवसांत लाखोंच्या संख्येत अनुयायी दीक्षाभूमीवर येतील. आज मोठ्या संख्येनं अनुयायी दीक्षाभूमीवर आले आहेत. त्यामुळे विशेषता त्रिस्तरीय सुरक्षा घेरा बनविण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमीवर केवळ शहरातीलच नाहीतर देशभरातून अनुयायी येतात. तसेच एक कार्यक्रम ड्रॅगन पॅलेसमध्येही होणार आहे. दोन्ही ठिकाणी व्हीआयपींची ये-जा ही असेल. त्यामुळे सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. केवळ दीक्षाभूमी (Deekshabhoomi ) परिसरातच 2500 कर्मचारी आणि एसआरपीएफच्या (SRPF) 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 100 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) आणि शहरातील सर्व 8 ही एन्ट्री पॉईंट्सवर पिकेट लावण्यात आले आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. व्यवस्था सांभाळण्यासाठी इतर जिल्ह्यातून 3 डीसीपी आणि 8 एसीपीही बोलावण्यात आले आहेत. शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारीही मैदानात असतील.

रेल्वे स्थानकावरही करडी नजर

पोलिस आयुक्तांनी सांगितले की, मुख्य रेल्वे स्थानकासह अजनी स्थानकावरही (Nagpur Junction Railway Station) मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी असणार आहे. त्यामुळे दोन्ही स्थानकाबाहेर पोलिसांचा पाहरा असेल. दीक्षाभूमीवर दर्शनादरम्यान गैरसोय होऊ नये म्हणून क्षमतेनुसार प्रवेश दिला जाईल. दीक्षाभूमीच्या चारही बाजूंच्या चौरस्त्यांवर बॅरिकेड् स लावण्यात येतील. आवश्यकता असल्यास आधी लोकांना क्रिपलानी चौकात थांबविण्यात येईल. जसे लोक बाहेर येतील तसेच प्रवेश दिला जाईल. समता सैनिक दलाचे 2 हजार लोकही व्यस्था सांभाळण्यात पोलिसांची मदत करतील. चेन स्नॅचिंग आणि खिसेकापूंवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेषातील पोलिसांचे वेगवेगळे पथक तैनात केले जात आहेत.

सकाळी आरएसएसचे पथ संचलन

दसऱ्याला सकाळपासूनच शहरभरात पोलिस तैनात असतील. उद्या, 5 ऑक्टोबरला सकाळी आरएसएसतर्फे (RSS Route March) पथ संचलनाचे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच सभाही होईल. येथेही व्हीआयपी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 29 ठिकाणी रावण दहणाचेही कार्यक्रमही होणार आहेत. 33 ठिकाणांवर देवी विसर्जनचा बंदोबस्त असेल. सर्व ठिकाणी पोलिस तैनात असतील. या दरम्यान वाहतूक व्यवस्था सांभाळणे आव्हानात्मक ठरणार आहे. नागरिकांना विनंती आहे की, विनाकारण या कार्यक्रम स्थळांच्या आसपास जाऊ नका.

वेगवेगळ्या ठिकाणी मदत केंद्र

पोलिस आयुक्तांनी सांगितले की, संपूर्ण प्रशासन नागरिकांसाठी व्यवस्था सांभाळण्यात व्यस्त आहे. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास वेगवेगळ्या ठिकाणी बनविण्यात आलेल्या मदत केंद्रांवर संपर्क करता येईल. आवश्यकता असल्यास 112 वरही संपर्क करता येऊ शकतो. नागरिकांना विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही संशयित वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास पोलिसांशी संपर्क करा. कोणत्याही स्थितीशी निपटण्यात पोलिस तयार आहेत.

अशी आहे सुरक्षाव्यवस्था

  • 5000 अधिकारी, कर्मचारी
  • 1000 होमगार्ड
  • 5 एसआरपीएफ तुकडी
  • 500 नवीन भरती

इतर महत्त्वाच्या बातम्या

दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांचे जत्थे मुंबईकडे, दोन्ही गटांकडून व्यवस्था, शिंदे गटाने विदर्भातून केली तयारी

Nagpur News : नागपूर-वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावर नारायण राणेंच्या विभागाकडून बॅनरबाजी, दुचारीस्वारांचे जीव धोक्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget