एक्स्प्लोर

आरटीओतील बदलीसाठी रॅकेट कार्यरत? चौकशीसाठी नागपूर पोलिसांकडून एसआयटीची स्थापना 

Nagpur News Update : नागपूर परिवहन विभागात बदली संदर्भात रॅकेट कार्यरत आहे का? आणि त्यामध्ये काही निवृत्त अधिकारी मध्यस्थाची भूमिका बजावत आहे का?  याचा तपास आता नागपूर पोलिसांची खास विशेष तपास पथक (एसआयटी ) करणार आहे.

Nagpur News Update : नागपूर परिवहन विभागात बदली संदर्भात रॅकेट कार्यरत आहे का? आणि त्यामध्ये काही निवृत्त अधिकारी मध्यस्थाची भूमिका बजावत आहे का?  याचा तपास आता नागपूर पोलिसांची खास एसआयटी (विशेष तपास पथक) करणार आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात परिवहन विभागातील बदल्या संदर्भात दोन परिवहन निरीक्षकांच्या फोन कॉल संदर्भातली एक ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये खाडे नावाचे निवृत्त परिवहन अधिकारी नागपुरात आले असून त्यांनी नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील बदलीस पात्र असलेल्या सर्व परिवहन अधिकाऱ्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावल्याचं संभाषण होते. ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमातून वायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्यासंदर्भात एसआयटीची स्थापना केली आहे.

नागपूर पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटी पथकात गुन्हे शाखेसह आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. एसआयटीने संबंधित पंचतारांकित हॉटेलमधील आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे प्रत्येकी दहा तासांचे फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्या फुटेजेमध्ये कोणकोणते परिवहन अधिकारी मध्यस्थाला भेटण्यासाठी या हॉटेलमध्ये आले होते, याची चौकशी केली जात आहे. नागपुरात मध्यस्थ म्हणून आलेले अधिकारी आणि त्यांना भेटायला आलेल्या परिवहन अधिकाऱ्यांचे भेटीचे उद्दिष्ट काय होते? खरंच हे प्रकरण पैसे घेऊन बदली करण्यासंदर्भातील आहे का? या संदर्भातील माहिती गोळा करून त्या सर्वांची चौकशी केली जाईल अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 

काय आहे प्रकरण?

नागपूर शहरातील एका पॉश हॉटेलमध्ये थांबलेला एक व्यक्ती दलालांच्या माध्यमातून आरटीओतील बढती बदलीसाठी अनेकांशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या रकमेची डील असल्याने ही चर्चा करणाऱ्यांनी शहानिशा चालविल्यामुळे संबंधित वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यातील प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) वादग्रस्त विषयांमुळे चर्चेत आहे. त्यातच आता ही या बदलीच्या रॅकेटमुळे आणखी भर पडली आहे. शिवाय व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे बदलीसाठी असे एक रॅकेट कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन तपास करण्यासाठी नागपूर पोलिसांकडून एसआयटीची स्थापना केल्याची माहिती मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या 

नागपुरात पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट, देशभरात अंमली पदार्थांचा पुरवठा करणारा म्होरक्या अटकेत  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget