एक्स्प्लोर

दिव्यशक्ती सिद्ध करा आणि तीस लाख रुपये मिळवा; धीरेंद्र कृष्ण महाराज यांना अनिसचं आव्हान

Nagpur News Update : धीरेंद्र कृष्ण महाराज यांची रामकथा सध्या नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर सुरू आहे. याच दरम्यान धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे 7 आणि 8 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात दिव्य दरबार पार पडले. याच दरम्यान अनिसने काही आरोप केले आहेत.

नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmoolan Samiti) मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधिश्र्वर धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) यांना आगळंवेगळं आव्हान दिलंय. तुमच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करा आणि तीस लाख रुपये रोख पुरस्कार घ्या, असां आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी दिलं आहे. 

धीरेंद्र कृष्ण महाराज यांची रामकथा सध्या नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर सुरू आहे. याच दरम्यान धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे 7 आणि 8 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात दिव्य दरबार पार पडले. याच दरम्यान अनिसने काही आरोप केले आहेत. ठिकठिकाणी होणाऱ्या आपल्या दिव्य दरबारच्या माध्यमातून धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांच्यात दिव्यशक्ती असल्याचा दावा करतात. त्या दिव्य शक्तीच्या माध्यमातून ते भाविकांच्या मनातील गोष्टी जाणून घेऊ शकतात. एखाद्या भाविकाने त्यांच्याकडे आपले नाव सांगितल्यास ते दिव्यशक्ती द्वारे त्याचा पत्ता, मोबाईल नंबर आणि जीवनातील इतर अनेक गोष्टींबद्दल माहिती देऊ शकतात, असा धीरेंद्र कृष्ण महाराज यांचा दावा असल्याचा अनिसचा आरोप आहे. 

खरंच धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यात दिव्यशक्ती असेल तर त्यांनी आम्ही सांगितलेल्या दहा लोकांच्या जीवनाबद्दल माहिती सांगावी. ही माहिती त्यांनी शंभर टक्के अचूक सांगण्या ऐवजी 90 टक्के अचूक सांगितली तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती धीरेंद्र कृष्ण महाराज यांना रोख 30 लाख रुपये देईल असे श्याम मानव यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे. मात्र, या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी धीरेंद्र कृष्ण महाराज यांनाही तीन लाख रुपये अनामत रक्कम म्हणून भरावी लागेल, असे शाम मानव यांनी म्हटले आहे. 

 धीरेंद्र कृष्ण महाराज जर त्या दहा लोकांसंदर्भात ते अचूक माहिती सांगू शकले नाहीत तर ते तीन लाख रुपये अनिसच्या खात्यात जमा होतील अशी अटही श्याम मानव यांनी घातली आहे. अनिसने यासंदर्भात नागपूर पोलिसांकडे तक्रार दिली असून जादूटोणाविरोधी कायद्याच्या तरतुदीनुसार नागपूर पोलिसांच्या दक्षता अधिकाऱ्याने स्वतः पुढाकार घेत त्यासंदर्भात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही अनिसकडून करण्यात आली आहे.  

दरम्यान, एबीपी माझाने या प्रकरणासंदर्भात नागपुरातील देवेंद्र कृष्ण महाराज यांच्या कार्यक्रम आयोजकांशी संपर्क साधून धीरेंद्र कृष्ण महाराज यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या तरी आम्ही या विषयावर काहीही बोलणार नाही असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले. 

महत्वाच्या बातम्या 

Pankaja Munde : राजकारणात नसते तर काय केलं असतं? पंकजा मुंडेंनी सांगितलं गुपित  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget