Tarun Bharat Editorial : कर्तव्यशून्य फेसबुक मुख्यमंत्री; 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंवर निशाणा
Tarun Bharat Editorial : "विनाशकाले विपरीत बुद्धी" या मथळ्याखाली तरुण भारत दैनिकात उद्धव ठाकरे यांच्यावर खास अग्रलेख लिहिला आहे. कर्तव्यशून्य फेसबुक मुख्यमंत्री असं उद्धव ठाकरेंना या अग्रलेखात संबोधलं आहे.
Tarun Bharat Editorial : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर तरुण भारतच्या (Tarun Bharat) अग्रलेखातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. "विनाशकाले विपरीत बुद्धी" या मथळ्याखाली तरुण भारत दैनिकात उद्धव ठाकरे यांच्यावर खास अग्रलेख लिहिला आहे. कर्तव्यशून्य फेसबुक मुख्यमंत्री असं उद्धव ठाकरेंना या अग्रलेखात संबोधलं आहे.
जनमताचा अनादर करुन उद्धव ठाकरेंनी लोकशाहीला कलंक लावला
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी सर्व मर्यादा सोडली. 2019 मध्ये जनमताचा अनादर करुन उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीला कलंक लावल्याचं या अग्रलेखात म्हटलं आहे. मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात कैद असायचे तर विरोधी पक्षनेता असलेले देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरायचे. त्याच काळात अकार्यक्षम फेसबुक मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख निर्माण झालेल्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हणण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी स्वतःचा चेहरा आरसात पाहावं असा सल्लाही देण्यात आला.
उद्धव ठाकरेंना पक्ष आणि कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत
"उद्धव ठाकरे यांचे चाळीस आमदार एकनाथ शिंदेंचे नेतृत्वात उद्धव आणि पक्ष सोडून गेले. याचं आत्मचिंतन करण्याऐवजी उद्धव ठाकरे भाजपवर दोषारोप करत असणार, तर देवही तुमची मदत करु शकत नाही अशी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.
अग्रलेखात पुढे लिहिलं आहे की, बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासारख्या कार्यक्षम पुतण्याला बाजूला सारुन उद्धव ठाकरेंच्या हातात पक्ष सोपवला होता. तो पक्ष आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सांभाळता आले नाहीत. हे पूर्णपणे उद्धव ठाकरेंचं अपयश आहे. आम्हीच सर्वश्रेष्ठ असल्याचे अहंकारातच उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला आहे.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व शब्द उच्चारु नये
जे गडकरी कधी महाराष्ट्राच्या राजकारणात भाष्य करत नाही. त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या फडणवीसांवरील टीकेनंतर आपले मत व्यक्त केले. याचाच अर्थ आहे की भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही टीका अनावश्यक आणि जिव्हारी लागली आहे, असं तरुण भारतच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
तसंच राजकीय भूमिका बदलून सध्या जनाब झालेल्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुखातून हिंदुत्व शब्द उच्चारु नये, असा सल्लाही या अग्रलेखाच्या शेवटी देण्यात आला आहे.
Tarun Bharat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कर्तव्यशून्य फेसबुक मुख्यमंत्री, तरुण भारतमधून निशाणा
हेही वाचा
'कलंक'वरून राजकीय वाद पेटला; ठाकरे,फडणवीसांसह अंबादास दानवेंमध्ये रंगला ट्विटर'वार'