Nagpur News: विजेच्या डीपीला स्पर्श करून पोलिसाची आत्महत्या, नागपूरमधील पेन्शननगर परिसरातली घटना
Nagpur News : घराजवळील महावितरणचे रोहित्र (लोखंडी बॉक्स) उघडून त्याला स्पर्श करत आत्महत्या केली
नागपूर : नागपुरात (Nagpur News) एका पोलीस कर्मचाऱ्याने अत्यंत धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली आहे. रोहित्र उघडून त्यातील बॉक्सला स्पर्श करून पोलिसानं आपलं जीवन संपवलं आहे काशिनाथ कराडे असं या पोलिसाचं नाव आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात (Nagpur Police) ते कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याचं तपासात समोर आलं आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
काशिनाथ कराडे (वय वर्ष 40 ) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिसाचे नाव असून काल दुपारी पेन्शन नगर परिसरात काशिनाथ यांनी महावितरणच्या रोहित्राला (डीपी) स्पर्श करत आत्महत्या केली. ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे काशिनाथ कराडे मूळचे सातारा जिल्ह्याचे असून नागपुरात पोलीस कर्मचाऱ्यांसह एका भाड्याच्या घरात राहात होते. त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात होती. काशिनाथ कराडे गेले काही दिवस तणावात होते. काल दुपारी ते घराबाहेर निघाले आणि घराजवळील महावितरणचे रोहित्र (लोखंडी बॉक्स) उघडून त्याला स्पर्श करत आत्महत्या केली.
रोहित्राला स्पर्श करताच विजेचा जोरदार झटका
महावितरणच्या रोहित्रमध्ये अत्यंत जास्त दाबाचा वीज प्रवाह असतो. त्यामुळे काशिनाथ यांनी रोहित्राला स्पर्श करताच त्यांना विजेचा जोरदार झटका बसला आणि काही वेळ त्याला चिटकून राहिल्यानंतर काशिनाथ खाली कोसळले. ही घटना पाहणाऱ्यांनी लगेच धाव घेऊन लाकडी काठीच्या मदतीने काशिनाथ यांना बाजूला करण्याचे प्रयत्न केले. मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. दुपारी रागाच्या भरात काशिनाख डीपीजवळ पोहचले. त्यानंतर डीपीचा दरवाजा उघडला. त्यानंतर मोबाईलमध्ये मेसेज केला. त्यानंतर डीपीला स्पर्श केला मात्र पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर दुसऱ्यांदा डीपीला स्पर्श केला. दुसऱ्यांदा डीपीला स्पर्श केला. त्यानंतर जमिनीवर कोसळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मात्र ताणतणावातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे.
हे ही वाचा :