Nagpur: नागपुरातील अर्ध्या भागात गुरूवारी पाणीपुरवठा बंद राहणार; पेंच 2 वर होणार 24 तास शटडाउन
Nagpur News: नागपूर महापालिकेने अमृत योजना 1 अंतर्गत पेंच 2 फीडरवर 24 तास शटडाऊनची योजना आखली आहे. त्यासाठी उद्या 1 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारी असा 24 तासांचा शटडाऊन करण्यात येणार आहे.
Nagpur News : नागपूर महानगर महापालिकेने अमृत योजना 1 अंतर्गत पेंच 2 फीडरवर 24 तास शटडाऊनची योजना आखली आहे. त्यासाठी उद्या, गुरुवारी 1 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजतापासून 2 फेब्रुवारीच्या सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांचा शटडाऊन (Nagpur News) करण्यात येणार आहे. सेमिनरी हिल्स येथे 1200 एमएम आणि 1000 एमएम व्यासाच्या जलवाहिनीचे इंटरकनेक्शन आणि गांधी टी- पॉईंट येथे 1000 एमएम आणि 700 एमएम व्यासाच्या जलवाहिनीचे इंटरकनेक्शनचे हे काम आहे. या कामांसाठी लक्ष्मीनगर झोनमधील सहा जलकुंभांना पाणीपुरवठा होणार नसल्यामुळे शेकडो वस्त्या कोरड्या राहणार आहेत.
या वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही
गायत्रीनगर जलकुंभ : बंडू सोनी लेआऊट, पठाण लेआऊट, तुकडोजीनगर, कामगार कॉलनी, आयटी पार्क, गायत्रीनगर, विद्याविहार, गोपालनगर, विजयनगर, व्हीआरसी कॅम्पस, पडोळे लेआऊट, गजानननगर, मणी लेआऊट, एसबीआय कॉलनी, करीम लेआऊट, उस्मान लेआऊट, एनपीटीआय, परसोडी प्रतापनगर जलकुंभ : खामला जुनी - बस्ती, सिंधी कॉलनी, व्यंकटेशनगर, गणेश कॉलनी, मिलींदनगर, प्रतापनगर, - टेलिकॉमनगर, स्वावलंबीनगर, दिनदयालनगर, लोकसेवानगर, आग्ने लेआऊट, पायनियर सोसायटी खामला, त्रिशरणनगर, पूनम विहार, स्वरूपनगर, हावरे लेआऊट, अशोक कॉलनी, गेडाम लेआऊट, एनआयटी लेआऊट, बुजबल लेआऊट प्रियदर्शनीनगर, इंगळे लेआऊट, साईनाथनगर.
खामला जलकुंभ : उज्वल नगर, जयप्रकाश नगर राजीवनगर, सीतानगर, राहुलनगर, सावित्रीनगर, तपोवन कॉम्प्लेक्स, सोमलवाडा, कर्वेनगर, पांडे लेआऊट, जुने आणि नवीन स्नेहनगर, मालवीयनगर, योगेक्षम लेआऊट, गांगुली लेआऊट, अभिनव कॉलनी, परिवर्तननगर, नरकेसरी लेआऊट, मेहरबाबा कॉलनी, छत्रपतीनगर, भाग्योदय सोसायटी, नागभूमी ले आऊट
टाकळी सीम जलकुंभ : हिंगणा रोड, राजेंद्रनगर, कल्याणनगर, यशोधानगर, वासुदेवनगर लुंबिनीनगर, गाडगेनगर, गुडलक सोसायटी, म्हाडा कॉलनी, सुर्वेनगर, आदर्शनगर, सौदामिनी सोसायटी, प्रगतीनगर, शहाणे लेआऊट, सुभाषनगर, नगरभेंडे लेआऊट, सोनेगाव, लोकसेवानगर, इंद्रप्रस्थनगर, अमर आशा लेआऊट, पन्नासे लेआऊट, एचबी इस्टेट, ममता सोसायटी, स्वागत सोसायटी, परातेनगर, समर्थ नगरी, अध्यापक लेआऊट, एलआयजी, अहिल्या नगर, हिरणवार लेआऊट, प्रसादनगर, सहकारनगर, गजानन धाम, मनीष लेआऊट, जलविहार कॉलनी, मंगलधाम सोसायटी, नेल्को सोसायटी, एनआयटी भाग्यश्री लेआऊट, झाडे लेआऊट, अष्टविनायक नगर कॉसमॉसनगर, राष्ट्रीयनगर,
जयताळा जलकुंभ : जयताळा परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, वडस्कर लेआऊट, विजय विहार, जनहित सोसायटी, एकात्मानगर, दादाजीनगर, वानखेडे लेआऊट, फाकडे लेआऊट, जयताळा झोपडपट्टी, महिंद्रा कॉलनी, ठाकरे कॉलनी, शारदानगर, साई लेआऊट, भांगे लेआऊट त्रिमूर्तीनगर जलकुंभ : त्रिमूर्तीनगर, सोनेगाव, पानसे लेआऊट, एचबी इस्टेट, सहकारनगर, गजानन धाम, पॅराडाईज सोसायटी, ममता सोसायटी, समर्थनगर, विजय सोसायटी, इंद्रप्रस्थनगर, लोकसेवानगर, मनीष लेआऊट, साईनाथनगर, अमर आशा लेआऊट, फुलसंगे लेआऊट, भुजबळ लेआऊट, गेडाम लेआऊट, गुडधे लेआऊट,
हनुमाननगर : चिंचभुवन ईएसआर- नरेंद्रनगर परिसर, बोरकुटे ले-आऊट, म्हस्के ले-आऊट, म्हाडा कॉलनी, मनीषनगर परिसर, जयदुर्गा सोसायटी, शिल्पा सोसायटी, नगरविकास सोसायटी, श्यामनगर, सूरज सोसायटी, साईकृपा सोसायटी, कन्नमवारनगर, इंगोलेनगर, पीएमजी सोसायटी, मधुबन सोसायटी. मंगळवारी : गिट्टीखदान जीएसआर- बापूनगर, गीतानगर, बाबा फरीदनगर, गायत्रीनगर, झिंगाबाई टाकळी बस्ती, साईबाबा कॉलनी, फरास, डोये ले- आउट, मानकापूर, ताजनगर, रतननगर, पी अँड टी कॉलनी, सादिकाबाद कॉलनी, जाफरनगर, अनंतनगर, बी. महेशनगर, बोरगावरोड, पटेलनगर, उत्थाननगर, पलोटीनगर, अवस्थीनगर.
इत्यादि शहरातील वस्ती आणि भागातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे. तरी नागरिकांनी पानी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.