नागपुरात जमावबंदीचे आदेश; कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निर्णय; शांततेचं आवाहन
Order of curfew in Nagpur : नागपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अमरावतीमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nagpur News : भाजपच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांनी कलम 144 लागू केलं आहे. मात्र त्याही परिस्थितीत भाजप मोर्चा काढण्यावर ठाम आहे. या मोर्चासाठी आधीच परवानगी घेतली होती आणि पोलीसांना त्याची माहिती होती, असं भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. नागपुरात जमावबंदी लावण्यासारखी कोणतीही स्थिती नव्हती, असं भाजपचं म्हणणं आहे.
नागपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अमरावतीमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडियावर भावना भडकावणाऱ्या पोस्ट टाकण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
नागपूर शहरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. पोलीस सर्व बाबींसाठी तयार आहेत. तर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. तसेच, सोशल मीडियावर भावना भडकणाऱ्या पोस्ट टाकण्यासही बंदी घालण्यात आली आहे. शहरात जवळपास 33 ठिकाणं संवेदनशील आहेत. पोलीस प्रशासनाकडून रूटमार्च काढले जात आहेत. गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस नजर ठेवून आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सर्वच धर्म गुरु, मौलवी याच्याची पोलीस विभागाची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात बोलताना अफवा किंवा सोशल मीडियात पोस्ट टाकू नये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आवाहन केलं आहे. शहरात शांतता आहे, कोणतीही आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस सर्व परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
"कोणत्याही आंदोलनांन परवानगी देण्यात आली नाही, काही मोर्चे विना परवानगी काढली जात आहेत. त्यावर कारवाई करू, जातीय वाद निर्माण होईल किंवा तसे परिणाम पडतील, अशा मोर्चांना परवानगी दिली जाणार नाही. शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.", अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. ते माध्यमांशी विमानतळावर बोलत होते.
नागपूर शहरात जवळपास 33 ठिकाण संवेदनशील असून पोलीस प्रशासनाकडून रूटमार्च काढले जात आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस नजर ठेवून आहे, कोणत्याही स्थितीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी सर्वच धर्मगुरु, मौलवी यांच्यासोबत पोलीस चर्चा करत आहेत. सामान्य नागरिकांनीही सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्या किंवा सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांनी पोस्ट टाकू नये, असं आवाहनही पोलीस आयुक्तांनी केलं आहे. कोणत्याही आंदोलनांना परवानगी देण्यात आलेली नाही, काही मोर्चे विना परवानगी काढले जात आहेत, त्यावर कारवाई करू असेही पोलीस आयुक्त म्हणाले.