एक्स्प्लोर

Nagpur News : व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतलं, पत्नी आणि मुलालाही पेटवण्याचा प्रयत्न

Nagpur News : कार पेटवून घेत व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली. एवढचं नाही तर त्याने पत्नी आणि मुलालाही पेटवण्याचा प्रयत्न केला. आर्थिक विवंचनेतून त्याने हे पाऊल उचललं.

Nagpur News : नागपूरमध्ये एका व्यावसायिकाने (Businessman) स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली. एवढंच नाही तर त्याने स्वत:च्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते त्यातून बचावले आहेत. परंतु या घटनेत व्यावसायिकाचा मात्र मृत्यू झाला. रामराज भट असं मृत व्यावसायिकाचं नाव असून आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

रामराज भट हे पत्नी संगीता आणि मुलगा नंदन यांच्यासोबत खापरी पुनर्वसन परिसरात गेले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या (Mass Suicide) करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी आणि मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खापरी इथल्या स्वामी विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

आर्थिक विवंचनेतून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न 
रामराज भट यांचं नट-बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. विविध कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे भट आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांचा मुलगा नंदन इंजिनियर होता. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होता, मात्र त्याने नकार दिला होता. त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते. त्यामुळे रामराज भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 

अॅसिडिटीचं औषध म्हणून विष प्यायला दिलं
वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी आणि मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी आणि मुलाला अॅसिडिटीच्या औषधाच्या नावावर विष पिण्यासाठी दिलं. परंतु पत्नी आणि मुलाला संशय आला. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बाटलीतील द्रवपदार्थ तिघांवरही फवारला. पत्नी आणि मुलाला काही कळण्याआधीच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले, ज्यात रामराज भट यांचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar: सरकारचे इतके मंत्री मान वाकवत मनोज जरांगेंकडे जातात, त्यांची मान कशी दुखत नाही? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका
सरकारचे इतके मंत्री मान वाकवत मनोज जरांगेंकडे जातात, त्यांची मान कशी दुखत नाही? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका
Nagpur DJ Ban : आधी कोर्टाकडून डीजे निर्बंधावर कडक अंमलबजावणीचे निर्देश, आता नागपूरमध्ये भाजपचा माजी आमदार मैदानात उतरला, मूक मोर्चा काढला
आधी कोर्टाकडून डीजे निर्बंधावर कडक अंमलबजावणीचे निर्देश, आता नागपूरमध्ये भाजपचा माजी आमदार मैदानात उतरला, मूक मोर्चा काढला
Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
Nagpur Crime News: नागपूरमध्ये 10 वर्षांच्या मुलीची टोळक्याने छेड काढली, भावालाही मारलं, गुंडांच्या दहशतीमुळे शिक्षण सोडण्याची वेळ
Nagpur Crime News: नागपूरमध्ये 10 वर्षांच्या मुलीची टोळक्याने छेड काढली, भावालाही मारलं, गुंडांच्या दहशतीमुळे शिक्षण सोडण्याची वेळ

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget