Praful Patel On Ajit Pawar : अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, प्रफुल्ल पटेल यांना विश्वास
Prful Patel On Ajit Pawar : "अजित पवार हे महाराष्ट्राचे वजनदार आणि लोकप्रिय नेते आहे. त्यांना कधी ना कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे
Prful Patel On Ajit Pawar : "अजित पवार हे महाराष्ट्राचे वजनदार आणि लोकप्रिय नेते आहे. त्यांना कधी ना कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी व्यक्त केला आहे. ते नागपुरात (Nagpur) बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असलेल्या समर्थक आमदारांकडून अजित पवार मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील वक्तव्ये, ट्वीट करण्यात आले होते. त्यातच प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.
अजित दादांना पुढच्या काळात कधी ना कधी संधी मिळेल : प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "आज ती जागा रिकामी नाही मग चर्चा कशाला करता? आज अजितदादा नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत, आणि ते आमचे पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आलेले आहेत, काही नवीन गोष्ट नाही आणि असं आहे की कधी ना कधी म्हणजे काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते, आणि अनेक लोकांना मिळालेली आहे, मग अजित दादांना आज नाही म्हणजे कधीपण पुढच्या काळात नक्कीच कधी ना कधी संधी मिळेल,आणि आम्ही देखील त्या दिशेने काम करु."
अमोल मिटकरी यांच्या ट्वीटची चर्चा
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनपेक्षितपणे सामील झालेल्या अजित पवार गटामुळे आधीच शिंदे गटाचे आमदारांमध्ये चलबिचलता सुरु आहे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या एका ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली होती. "अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, राज्यात लवकरच अजित पर्व सुरु होईल असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं होतं. अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. अजित पवारांची राजकारणात काम करण्याची स्टाईल, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कार्यशैली त्यातून दाखवण्यात आली होती. हा व्हिडीओ शेअर करत अमोल मिटकरी यांनी राज्यात लवकरच अजित पर्व सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असं कॅप्शन त्यांनी त्या ट्वीटला दिलं होतं.
हेही वाचा