Mihan Nagpur : समस्या सोडविण्याचे पुन्हा 'गाजर' ; गुंतवणूकदार अजूनही समाधानी नाही
मुलभूत सुविधांवरही तीन वर्षांपासून कोणताही निर्णय घेतला जात नाही. जर हे कार्य स्थानिक अधिकारी करू शकत नसतील, तर आम्ही त्यांच्यावर विश्वास कसा करायचा, असा प्रश्नही उद्योजकांनी उपस्थित केला आहे.
Mihan Nagpur News : महाराष्ट्र एअरपोर्ट विकास कंपनी (एमएडीसी)च्या (Maharashtra Airport Development Company) अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी मिहानच्या युनिटधारकांची बैठक झाली. अधिकाऱ्यांनी समस्या ऐकून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. टेंडर काढणे, पुन्हा चर्चा करणे अशा आश्वासनांमुळे अनेक यूनिटधारक नाराज दिसले. त्यांचे म्हणणे आहे की, मागील तीन वर्षांपासून त्यांना असेच आश्वासन दिले जात आहे, परंतु समस्या जैसे थे आहे. बैठक होताच अधिकारी मुंबईला निघून जातात, नंतर मात्र ऐकणारे कुणीच नसते. नुकत्याच झालेल्या बैठकीत एमएडीसी (MADC) मुंबईचे तीन अधिकारी उपस्थित होते. परंतु ऐकण्याचे काम अधिक तर तोडगा काढण्याकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसले.
बैठकीला व्यापार सल्लागार समिती (BAC) चे पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते. त्यांनी समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या दिशेने पाऊल टाकले. समितीच्या प्रतिनिधींचे म्हणणे होते की, एमएडीसीने सकारात्मकता दाखविली, त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, लवकरात लवकर समस्यांचे निराकरण होईल. बैठकीतच काही कंपन्यांच्या समस्यांचे निराकरणही झाले. त्यामुळे ते गुंतवणूकदार आनंदी दिसले.
टेंडरचे दिले जाते कारण
बैठकीत गुंतवणूकदारांनी सांगितले की, रस्ते, उड्डाणपूल, मोकाट जनावरांचा हैदोस, साफ-सफाई असे सामान्य कामसुद्धा एमएडीसीकडून होताना दिसत नाही. यासाठीसुद्धा वारंवार टेंडर काढण्याचे कारण सांगितल्या जाते. डब्ल्यू बिल्डिंगमध्ये शौचालय, पाणी, कँटीन यासाख्या समस्या आहेत. परंतु यावरही तीन वर्षांपासून कोणताही निर्णय घेतला जात नाही. जर हे कार्य स्थानिक अधिकारी करू शकत नसतील, तर आम्ही त्यांच्यावर विश्वास कसा करायचा, असे प्रश्नही ते उपस्थित करू लागले आहे.
एमडीने घ्यावा पुढाकार
गुंतवणूकदारांनी स्पष्ट म्हटले की, उपस्थित अधिकाऱ्यांच्या भरवशावर समस्या संपणार, असे वाटत नाही. एमएडीसीचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालकांनी पुढे यायला हवे. सर्व स्टेक होल्डरसह (Stake Holder) बैठक घेऊन समस्या सोडवाव्या, परंतु ते गुंतवणूकदारांना भेटण्यास संकोच करत आहे. अशात मिहानची प्रगती होणे कठीण आहे. काही लोकांनी सांगितले की, मिहानमध्ये भू-माफिया काम करीत आहे. अशा भू-माफियांवर छोटे अधिकारी अंकुश लावू शकत नाही. यासाठी उपाध्यक्षांना प्रत्यक्ष येऊन पाहावे लागेल. तेव्हाच समस्यांचे निवारण शक्य आहे. त्यामुळेच प्लॉटधारकांनी जमीन विकून निघून जावे म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे. या सर्वांमुळे मात्र मिहानची प्रतिष्ठा मलीन होत आहे
ही बातमी देखील वाचा...