![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
चिमुकल्यांना मोबाईल देताय? सावधान! मोबाईल न दिल्याने पाचवीतल्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
Nagpur News : मोठ्या बहिणीने मोबाईल दिला नाही म्हणून 11 वर्षाच्या मुलाने गळफास लावून घेतल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे.
![चिमुकल्यांना मोबाईल देताय? सावधान! मोबाईल न दिल्याने पाचवीतल्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या nagpur midc 11 years old boy commits suicide by hanging himself for not giving him mobile phone चिमुकल्यांना मोबाईल देताय? सावधान! मोबाईल न दिल्याने पाचवीतल्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/01/f8ad06a623000c6f7bd6082bc24d00e71693582085415490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : मोठ्या बहिणीने मोबाईल (Mobile) दिला नाही म्हणून नागपूरमध्ये एका 11 वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. नागपूरच्या (Nagpur Suicide News) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मागच्या एका वर्षात लहान मुलाच्या आत्महत्येला मोबाईल कारणीभूत ठरल्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे मोबाईल आणि त्यामध्ये असलेल्या सोशल मीडियाचा लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम तर होत नाही ना अशा प्रश्न उपस्थित होतोय.
नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या बहिणीने मोबाईल दिला नाही म्हणून आलेल्या तत्कालीन रागातून एका 11 वर्षाच्या मुलाने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या खोलीत जाऊन त्याने ओढणीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबासह सर्वांनाच हादरून सोडलं आहे.
Nagpur Suicide News : मुलांतील चिडचिडेपणा वाढतोय
सध्या घरोघरी मुलांच्या हातात तासंतास मोबाईल असणे ही सामान्य बाब झाली आहे. जर एखाद्या मुलांच्या हातात मोबाईल नसेल तर आश्चर्यच. लहान मुलं ही मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यात तरुण आणि वयस्क पण मागे नाहीत. मात्र लहान मुलांच्या मनावर त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम पाहायला मिळतात. मोबाईच्या अती वापरामुळे लहान मुलं जिद्दी, रागीट बनत चालले असून त्यांच्यातला चिडचिडेपणा पण वाढत चालला आहे.
मात्र 11 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला कुठून? त्याला या वयात कोणत्या गोष्टीने आत्महत्येस प्रेरित केले? तर याचे मूळ मोबाईल आहे आणि तो पाहत असलेल्या गोष्टीत दडले असल्याचे मानोसपचार तज्ञ सांगतात. सध्या सोशल मीडियावर शॉट्स आणि रीलचा भडीमार सुरु आहे. 12 वर्षाखालील मुलं ज्या प्रकारचे हे व्हिडीओ बघतात ते त्यांच्या मनात मोठे घर करून जाते. त्यामुळे लहान हट्टी आणि तापट बनत चालली आहेत. नागपूर सारखी घटना टाळायची असेल तर लहान मुलं मोबाईलमध्ये काय बघतात, त्यांच्या वर्तणुकीत काही बदल तर आला नाही ना? यावर आता पालकांची नजर असणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केलं.
सध्या बरेच पालक कामाच्या तणावानंतर रिलॅक्स व्हावं म्हणून घरी मोबाईल मध्येच डोकावले असतात. ते बघून मग लहान मुलं तसेच करतात. त्यामुळे भविष्यातील धोक्यांना टाळायचे असेल तर बदलाची सुरूवात ही पालकांना आपल्यापासून करावी लागणार आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)