एक्स्प्लोर

Nagpur Lok Sabha 2024 : नागपुरातून गडकरींचं ठरलं! लोकसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वसामान्य उतरले रस्त्यावर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरसह देशभरात केलेले विकासकाम आणि राजकारण विरहित लोककल्याणकारी निर्णयांमुळे त्यांची नागपूर लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवड व्हावी, अशी मागणी नागपूरकरांनी केली आहे.

Nagpur : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाजपची (BJP) लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राज्यातील 10 जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली असून सलग तसऱ्यांदा गडकरी हे नागपूर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. गडकरी यांना नागपूरच्याच गडाचे तिकीट मिळाले असल्याने त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला असून नागपूर भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरसह देशभरात केलेले विकासकाम आणि राजकारण विरहित लोककल्याणकारी निर्णयांमुळे त्यांची नागपूर लोकसभा निवडणुकीत (Nagpur Lok Sabha Constituency) बिनविरोध निवड व्हावी, या मागणीसाठी सर्वसामान्य नागपूरकर रस्त्यावर उतरले आहेत. हातात नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी बिनविरोध का नाहीत? अशा आशयाचे बॅनर घेत नागपूरकरांनी ही मोहीम राबवली आहे.

नागपुरकरांनी जाहीर केला आपला कौल?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात नागपूरचे विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील 20 नेत्यांचा समावेश आहे. काल, 13 मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या या यादीत नितीन गडकरी यांचे नाव येताच नागपूर भाजपमध्ये मोठ्या उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. काल शेकडो भाजप कार्यकर्ते आणि नागपूरकरांनी नितीन गडकरींचे नागपूर विमानतळावर वाजतगाजत स्वागत केले. असे असताना नागपूरातून नितीन गडकरींच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळेल या बाबत अद्याप कुठलेही नाव पुढे आलेले नसतांना नागपूरकरांनी आपला कौल जाहीर करून टाकल्याचे बघायला मिळत आहे.

नितीन गडकरींमुळे नागपूरात अनेक संस्था आल्या, विकासाची मोठी कामं झाली, यासह त्यांनी देशभरात केलेली विकासाची कामे बघता विकासाच्या आड राजकारण कधीही येऊ न दिल्याने त्यांची प्रतिमा देशभर विकासपुरुष अशी आहे. त्यामुळे राजकरणांपेक्षा विकासाला सर्वस्वी मानणाऱ्या नितीन गडकरी यांची निवड बिनविरोध व्हायला हवी, अशी मागणी नागपूकरांनी केली आहे. 

निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी 

नागपूरातील इतर विरोधीपक्षानी नितीन गडकरी यांच्या विरोधात कुठलाही उमेदवार उभा न करता देशात एक नवा आदर्श उभा करावा. तसेच विकासासोबत सर्वसामान्य जनता कायम उभी असते, हा संदेश देखील या माध्यमातून द्यावा, अशी आग्रही मागणी नागपूकरांनी केली आहे. या मागणीसाठी नागपूरकर रस्त्यावर उतरून मोहीम राबवत आहेत. या मोहिमेंतर्गत शहरातील मुख्य चौकात हातात 'नागपूरची शान असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बिनविरोध निवड का नाही, असा आशय असलेला बॅनर घेत आपली भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इतर राजकीय पक्षांनीही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती देखील या नागरिकांनी या मोहिमेतून केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

BJP Candidates List : भाजपकडून लोकसभेसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर; खूर्ची सोडलेल्या माजी सीएम खट्टरांना तिकिट

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget