एक्स्प्लोर

Lockdown In Nagpur | नागपुरात लॉकडाऊनची घोषणा

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी  15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे. 

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी  15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे. 

काय सुरु राहणार?

नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत हे लॉकडाऊन लावले जाणार आहे. 15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी असणार आहे. नागपूर पोलिसांना कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं. या काळात उद्योग सुरू राहतील. सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील. भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया या सेवा देखील सुरु राहतील. 

काय बंद राहणार?

लॉकडाऊन केलेल्या क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत. दारूची दुकाने बंद राहतील. मात्र दारूची ऑनलाईल घरपोच सेवा सुरू राहणार आहे. 

वर्षभरापूर्वी आजच नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्णाला आढळला होता

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं की, एक वर्षांपूर्वी आजच नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्णाला आढळला होता. तेव्हापासून आजवर नागपुरात एक लाखाहून अधिक नागरिकांना कोरनाची लागण झाली आहे. तर 4 हजार 215 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मध्यंतरी कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली होती, मात्र आता पुन्हा रुग्ण वाढत आहेत. आज आम्ही प्रशासनासोबत बैठक घेतली. नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहेत. तर काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. काही ठिकाणी आयसोलेशनच्या नियमांचा उल्लंघन केलं जात आहे. या सर्व गोष्टींमुळे कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागपुरात लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. 

नागपूरची कोरोनाची आकडेवारी (10 मार्च)

नागपुरात काल (10 मार्च) रोजी 1710 ( नागपूर शहर 1433, नागपूर ग्रामीण 277) कोरोनाबाधीत रुग्ण आढळले होते. सप्टेंबर 2020 नंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या होती. काल 947 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget