एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणातल्या चिमुकलीची झुंज अपयशी; अपघातातील मृतांचा आकडा तीनवर

Nagpur Hit And Run Case: नागपुरात सोमवारी रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कुटुंबाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांनी गाडीखाली चिरडलं, याच अपघातातील चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

Nagpur Hit And Run Case: नागपूर : नागपूरच्या (Nagpur Accident) दिघोरी नाक्यावरील 'हिट अँड रन' (Hit And Run Case) प्रकरणातील चिमुकलीची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. वडिलांनंतर चिमुकलीचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. दरम्यान, नागपुरात सोमवारी रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कुटुंबाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांनी गाडीखाली चिरडलं होतं. 

सोमवारी नागपूरच्या दिघोरी नाक्यावरील 'हिट अँड रन' प्रकरणातील चिमुकलीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. रुग्णालयात उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झालाय. पित्यानंतर मुलीच्या मृत्यूनं कुटुंबावर मोठा आघात झालाय. या अपघातातील मृतांची संख्या आता तीनवर गेली आहे. सोमवारी रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कुटुंबावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांनी बेदारकपणे कार चालवून अपघात केला होता. 

मद्यधुंद तरुणाची अद्याप ब्लड टेस्ट नाही 

नागपूरच्या दिघोरी टोल प्लाझाजवळ एका मद्यधुंद कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना अक्षरक्ष: चिरडत नेलं होतं. ही घटना घडून आज 3 दिवस उलटले असले तरी, अद्याप पोलिसांनी संशयित आरोपी आणि त्याच्या पाच मद्यधुंद मित्रांचे रक्ताचे नमुने प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (आरएफएसएल) पाठवलेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

अपघाताची संपूर्ण सीसीटिव्ही कॅमेरात कैद 

अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. ही कार इतकी वेगवान होती की या अपघातात रस्त्याच्या लगत उभ्या असलेल्या काही दुचाकी अक्षरक्ष: उडवल्या आहेत. तर अनेकांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार यात चार जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत असून पुढील तपासाअंती अधिक माहिती कळू शकणार आहे. मात्र, या घटनेने पुन्हा शहर एकदा हादरले आहे.  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेची अंतिम टक्केवारी समोर, कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतं?
Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सExit Polls maharashtra Vidhansabha 2024 :महाराष्ट्राचा महापोल;10 पैकी 7 एक्झिट पोलमध्ये महायुती पुढे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेची अंतिम टक्केवारी समोर, कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतं?
Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Embed widget