(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis : निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याचं प्रकरण, फडणवीसांविरोधातील याचिकेवर 8 सप्टेंबर रोजी निकाल
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 मधील निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याच्या प्रकरणाची सुनावणी आता 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 2014 मधील निवडणूक शपथपत्रात (Affidavit) दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याच्या प्रकरणाची सुनावणी आता 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणाचा निकाल आज (5 सप्टेंबर) सुनावला जाणार होता. परंतु न्यायालयाने निकालाची तारीख ही 8 सप्टेंबर निश्चित केली आहे. वकील सतीश उके (Satish Uke) या प्रकरणात तक्रारदार त्यांनी याचिका दाखल केली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून निकाल काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
नजरचुकीने दोन गुन्हे नमूद करायचे राहिले : फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन गुन्हे नमूद न केल्याप्रकरणी न्यायालयीन लढा सुरु आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आधीच पूर्ण झाला असून नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी या संदर्भात निकाल सुनावू शकतात. त्यासाठी न्यायालयाने 8 सप्टेंबर तारीख ठरवली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात दोन गुन्हे नजरचुकीने नमूद करायचे राहिल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितलं आहे.
'ते' दोन गुन्हे नेमके कोणते?
पहिली तक्रार ही बदनामीच्या गुन्ह्यासंदर्भातील (क्रिमिनल डिफेमेशन) संबंधित आहे. त्यावेळी फडणवीस हे नगरसेवक होते. त्यांनी एका सरकारी वकिलाविरुद्ध काही तक्रारी केल्या होत्या. त्यांना त्या खटल्यातून दूर करण्यात यावे, अशी मागणी करणारे एक प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढले होते. त्यावर त्या वकिलाने 'क्रिमिनल डिफेमेशन' दाखल केले. नंतर त्याच वकिलांनी ते परत घेतले.
दुसरे प्रकरण एका झोपडपट्टीवासियांसाठी आंदोलन करतानाचे आहे. एका जागेवर असलेल्या झोपडपट्टीला मालमत्ता कर लावण्यात यावा, असे पत्र फडणवीस यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता कर लावला. ती जमीन खाजगी असून आपल्या मालकीची आहे, अशी खाजगी अशी खाजगी तक्रार एका व्यक्तीने केली होती. पुढे ही तक्रार उच्च न्यायालयाने फेटाळली.
VIDEO : Devendra Fadnavis Case : फडणवीसांविरोधातील याचिकेवर 8 सप्टेंबरला निकाल ABP Majha