एक्स्प्लोर

Nagpur News : अल्पवयीन मुलीची तस्करी करणाऱ्या महिलेला सात वर्षे कारावास; विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय

Nagpur News: देहव्यापाराकरिता अल्पवयीन मुलीची तस्करी करणाऱ्या महिलेला दोषी ठरवत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायालयाचे हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.

Nagpur Crime नागपूर : देहव्यापाराकरिता अल्पवयीन मुलीची तस्करी करणाऱ्या महिलेला दोषी ठरवत कमाल सात वर्षे सश्रम कारावास आणि एकूण पाच हजार 500 रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायालयाचे (Special Sessions Court) न्यायाधीश एस. ए. श्रीखंडे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. सीमा प्रेमलाल छाडी ( 40) असे या महिला आरोपीचे नाव असून ती नागपूरातील (Nagpur Crime) गंगा जमुना वस्तीमधील रहिवासी आहे. तर यातील पीडित मुलगी पोलीस (Nagpur Police) तक्रारीच्या वेळी 14 वर्षाची होती. मात्र ज्यावेळी ती अवघ्या चार वर्षांची असताना तीचे अपहरण करण्यात आले होते. 

चार वर्षांची असताना अपहरण

प्रकरणातील पीडित मुलगी चार वर्षाची असताना एका अज्ञात आरोपीने खेळणी देण्याचे आमिष दाखवून तिला सोबत नेले होते. त्यानंतर तिला नागपूरसह विविध ठिकाणी ठेवण्यात आले. दरम्यान 9 मे 2022 ला प्रकरणातील दोषी महिला आरोपी नीलम छाडीने पीडित मुलीला जबर मारहाण केली. त्यामुळे मुलीने संधी साधून पळ काढला आणि थेट पोलीस स्टेशन गाठले होते. त्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार लकडगंज पोलिसांना सांगितला होता. यावर पोलिसांनी पीडित मुलीची तक्रार दाखल करून संबंधित संशयित आरोपींविरोधात गुन्हा दखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने संशयित आरोपीविरुद्ध 12 साक्षीदारांचे बयाण तपासून गुन्हे सिद्ध केले आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अ‍ॅड. सोनाली राऊत यांनी कामकाज पाहिले. तर न्यायाधीश एस. ए. श्रीखंडे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. 

मोबाइल मधील चॅटिंग पालकांना दाखविण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार

मोबाइल चॅटिंग पालकांना दाखविण्याची धमकी देत एका 15 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अनिकेत हंसराज खोब्रागडे (21, रा. कामठी) असे या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी त्याची 15 वर्षीय मुलीशी ओळख झाली होती. दरम्यान त्याने मुलीशी जवळीक साधत तिच्याशी चॅटिंग सुरू केले. त्यात काही अश्लील चॅटिंगदेखील होते. ते चॅटिंग तिच्या पालकांना दाखविण्याची धमकी देत अनिकेतने तिच्यावर अत्याचार केला.

हा प्रकार 27 फेब्रुवारी रोजी घडला. त्यानंतर मुलीने धाडस करत या प्रकाराची माहिती पालकांना दिली असता मुलीच्या आईने तत्काळ  यशोधरानगर पोलीस स्टेशन गाठून अनिकेत विरोधात तक्रार केली. या तक्रारी वरून पोलिसांनी अनिकेत विरोधात गुन्हा नोंदवत त्यांला अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Sharad Pawar : 'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Embed widget