Nagpur Crime news : उपराजधानी हादरली, 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार
Nagpur Crime news : उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा हादरलं आहे. 19 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना नागपुरमध्ये घडली आहे.
Nagpur Crime news : उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा हादरलं आहे. 19 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना नागपुरमध्ये घडली आहे. सोमवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 19 वर्षीय मुलगी गायिका आहे. या मुलीचं अपहरण करुन सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिस आयुक्तांसह पोलिसांचा ताफा सीताबर्डी पोलिस ठाण्यात हजर झाला असून तपास सुरु आहे.
गाण्याच्या क्लासेसला जाणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे राज्याची उपराजधानी नागपूर हादरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील गुन्हेगारीच्या घटना चर्चेत असतानाच आता सामूहिक अत्याचाराची घटना घडल्यानं नागपूर हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी पीडित तरुणीचं रामदास पेठेतून अपहरण केल्याची माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 19 वर्षी तरुणीचं नराधमांनी रामदासपेठ भागातून अपहरण केलं, त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. पीडित तरुणी गायनाचे क्लासेस करते. आज सकाळी (13 डिसेंबर) 11 वाजता तरुणी क्लासेसला जात होती. यावेळी आरोपींनी रामदासपेठ येथे तरुणीला गाठलं. आरोपींनी पीडितेचं अपहरण केलं. त्यानंतर नागपूर शहरातील कळमना परिसरात तरुणीला घेऊन गेले. कळमना परिसरात नेल्यानंतर आरोपींनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केले.
दरम्यान, पीडितेने याप्रकरणी सुरुवातीला कळमना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिचे अपहरण सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन झाल्यामुळे पोलिसांनी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये पाठवले. अखेरीस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे कळमना पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे. सामूहिक बलात्कार करणारे आरोपी पीडित तरुणीच्या ओळखीचे आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live