(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation: सरकारच्या चार पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना ओबीसमधून आरक्षण देणं शक्य नाही: विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Maratha Reservation : मनोज जरांगे हे सरकारला धमकावत असून त्यांना आणि सरकारला राज्याला क्रांतीच्या मार्गावर न्यायचं आहे की शांतीच्या मार्गावर हे त्यांनी ठरवावं अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
नागपूर: सरकारच्या चार पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय भूमिका घेतंय याबद्दल आम्ही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation) मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले असून रोज नवे वादंग सुरू आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांसह मराठा-ओबीसी (Maratha -OBC) हा वाद देखील डोके वर काढत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी शिंदे समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून कोणीही वक्तव्य करू नये' अशा सूचना महायुतीतील मंत्र्यांना दिल्या आहेत. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) यांनी मराठा आरक्षण विषयी सरकार काय निर्णय घेते याकडे वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून विविध विषयावर त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
राज्याला क्रांतीच्या मार्गावर न्यायचं आहे का?
मराठा आरक्षणाविषयी बोलतांना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना सरकारसह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर देखीक टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हे सरकारचे काम आहे. आरक्षण आम्ही देऊ असे सरकार म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी आता आरक्षण दिले पाहिजे. हे आरक्षण कसं देणार हा विचार सरकारला करायचा आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange) आता सरकारला अल्टीमेटम देत आहे, त्यांना धमकावत आहे. म्हणजे जरांगे पाटील आणि सरकारला राज्याला शांतीच्या मार्गावर न्यायचे आहे की क्रांतीच्या मार्गावर न्यायचे आहे, हा निर्णय आता सरकारचा आहे. आता सरकार काय निर्णय घेईल यावर आमचे पूर्ण लक्ष आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी बोलतांना दिली.
मराठा आरक्षणावर वेट अँड वॉचची भूमिका
मागील 30 ते 40 वर्षापासून सरकारवर ओबीसी नेत्यांचा दबाव होता, ओबीसी नेत्यांनीच मराठा आरक्षण दाबून ठेवाल्याचा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) केला होता. मनोज जरांगेच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकार काय सरकारच्या चार पिढ्या आल्या तरी ओबीसी मधून आरक्षण देणे शक्य नाही. कुठल्याही एका जातीला दुसऱ्या प्रवर्गामधून आरक्षण द्यायचे असेल तर त्याची एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण करावी लागते. त्यासाठी मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून प्रक्रिया राबवावी लागते. यापूर्वी गायकवाड आयोगाने सर्वेक्षण करून ती प्रक्रिया केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं. या धमक्यांना सरकार किती दाद देते व पुढे सरकार काय करते यावर आमचं लक्ष असल्याचे मत देखील विजय वडेट्टीवार यांनी बोलतांना व्यक्त केले.
गृह विभागाची इज्जतच चव्हाट्यावर आली आहे
विजय वडेट्टीवार यांनी ललित पाटील ( Lalit Patil Drug Case) प्रकरणावर बोलतांना राज्याच्या गृह खात्यावर देखील सडकून टीका केली आहे. गृह खात्याची इज्जत चव्हाट्यावर आली आहे. ललित पाटील रुग्णालयात राहून ड्रग्सचा धंदा करत होता. पुणे व महाराष्ट्र पोलिसांनी विश्वासा गमावले आहे. लोकांचा विश्वास गृह विभागाकडून कमी होत. ललित पाटील याप्रकरणी उद्या चार पोलिसांना निलंबित केलं जाईल, मात्र पोलिसांची हिंमतच कशी होते हा प्रश्न देखील वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. जेल ते कोर्ट दरम्यान गाडी कुठेही थांबवता येत नाही. मात्र सदर व्हिडीओमध्ये गाडी थांबल्याचे दिसत आहे. पोलीस आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत आहेत. त्यामुळे पोलिसांना सस्पेंड करून प्रश्न सुटणार नाही. असे मत देखील त्यांनी बोलतांना व्यक्त केले.
देशात दोन सरकार, त्यात बागेश्वर धाम सरकार सर्वश्रेष्ठ
विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या सरकार वर टीका करतांना राज्यात पर्यायी सरकार चालत आहे अशी प्रतिक्रिया दिली. देशात दोन सरकार आहेत. त्यात एक बागेश्वर धाम (Bageshwar Dham) सरकार आणि दुसरी दिल्ली सरकार. या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण अशी स्पर्धा आहे. यात मात्र बागेश्वर धाम सरकार श्रेष्ठ ठरत असल्याचा सध्याचा चित्र असल्याचे देखील वडेट्टीवार म्हणाले.
ही बातमी वाचा: