नागपुरात भोंदू बाबावर विश्वास ठेवणे पडले महागात, तरुणीला भूत बाधा झाल्याचे सांगत कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार
भूत बाधा दूर करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने त्या कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
![नागपुरात भोंदू बाबावर विश्वास ठेवणे पडले महागात, तरुणीला भूत बाधा झाल्याचे सांगत कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार Nagpur Bhondu Baba busted accused sexual harassment नागपुरात भोंदू बाबावर विश्वास ठेवणे पडले महागात, तरुणीला भूत बाधा झाल्याचे सांगत कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/19020909/WhatsApp-Image-2020-12-19-at-7.44.27-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपुरात एक भोंदू बाबावर विश्वास ठेवणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. कारण भूत बाधा दूर करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने त्या कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी भोंदू बाबा धर्मेंद्र निनावेला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या पारडी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन तरुणीची तब्येत बरी राहत नसल्यामुळे तिच्या वडिलांनी ओळखीच्या मांत्रिकाकडे उपचारासाठी मदत मागितली. मांत्रिक धर्मेंद्र निनावेने तुमच्या घरी भूत बाधा आहे. सर्वाधिक प्रभाव तुमच्या मुलीवर आहे. पूजा न केल्यास कुटुंबातील सदस्यांचा जीव धोक्यात येईल असे सांगितले.
अल्पवयीन तरुणीला उपचार करण्याच्या नावाखाली तिला एकट्यात नेणे, पूजा करणे सुरु केले. एकट्यात त्याने अल्पवयीन तरुणीसोबत शारीरिक लगट करणे सुरु केले. तरुणी मुकाट्याने सर्व सहन करत आहे हे पाहून भोंदूबाबाने माझ्याशी शारिरिक संबंध न ठेवल्यास तुझ्या आई- वडिलांचा मृत्यू होईल अशी भीती दाखवत तरुणीवर दोन महिने अत्याचार केले. इतकेच नव्हे तर पीडितेची आई, मामी आणि आजीवरही या भोंदूबाबाने वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले. भोंदू बाबाने पूजेच्या बहाण्याने कधी चंद्रपूर तर कधी डोंगडगढला नेऊन तरुणीची आई, मामी आणि आजीवर कुकर्म केले. प्रत्येकीला भूत बाधेने कुटुंबातील इतर सदस्यांचा नाश होईल अशी बतावणी करत त्याने अत्याचार सहन करायला लावले. एवढेच नाही तर या दरम्यान भोंदू बाबाने पीडित तरुणीच्या वडिलांकडून पूजेच्या नावाने लाखो रुपये उकळल्याची ही तक्रार पीडित कुटुंबाने केली आहे.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भोंदू बाबा धर्मेंद्र निनावेला अटक केली आहे. त्याने पोलिसांच्या चौकशीत त्याचा गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे. दरम्यान, याच भोंदूबाबाने आणखी काही महिला आणि तरूणींवर अत्याचार केले आहे का याचा तपास ही पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)